ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला यापुढे आरटीओ च्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचे नियम अतिशय सोपे केले आहेत.
1
ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनुसार, आता तुम्हाला RTO ला जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही.
2
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओमधील चाचणीची वाट पाहावी लागणार नाही.
3
तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करू शकता.
4
ज्यांना लायसन्स हवे आहे त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी उत्तीर्ण करावी लागेल
5
अर्जदारांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे अर्जदाराचा वाहन चालविण्याचा परवाना जारी केला जाईल.
6
प्रशिक्षण केंद्रांबाबत RTO कडून काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटीही आहेत. ज्यामध्ये प्रशिक्षण केंद्रांच्या क्षेत्रापासून ते प्रशिक्षकाच्या शिक्षणापर्यंतचा समावेश आहे.
7
अधिकृत एजन्सी हे सुनिश्चित करेल की दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रांकडे किमान एक एकर जागा आहे
8
ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये मध्यम आणि जड प्रवासी वस्तूंच्या वाहनांसाठी किंवा ट्रेलर्ससाठी दोन एकर जागा आवश्यक आहे.
9
ट्रेनर किमान 12 वी पास असावा आणि त्याला किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, त्याला वाहतूक नियमांचे चांगले ज्ञान असावे.