आता लॉकडाऊन मध्ये रिचार्ज, पंखे, पुस्तकांची दुकाने सुरू

लॉकडाऊन मध्ये मोबाइल रिचार्ज, पंखे, पुस्तकांची दुकाने सुरू

आता लॉकडाऊन मध्ये मोबाइल रिचार्ज, पंखे, पुस्तकांची दुकाने सुरू करण्यास परवानगी जाहीर

लॉकडाऊनमध्ये काही व्यवहारांना तसेच अन्नप्रक्रिया उद्योग, दूध डेअरी सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सहसचिव सलीला श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे.

सर्व प्रथम म्हणजे ज्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बँकेतील खात्यांचे काम करणारे आणि देखभालीसाठी आवश्यक असलेल्या सेवांना सरकारने सूट दिली आहे.

याशिवाय सरकारने शहरी भागातील अन्न प्रक्रिया उद्योग जसे दूध डेअरी, ब्रेडचे कारखाने (बेकरी), पीठाच्या गिरण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

त्यासोबतच मोबाइल प्रीपेड रिचार्ज करण्यासाठी रिचार्जची दुकानेही सुरू राहणार असून पंख्याची दुकाने सुरू ठेवण्यासही सरकारने मुभा दिली आहे.

तसेच फळांची आयात- निर्यात, कृषी आणि फळबाग उत्पादन करणाऱ्या संशोधन संस्थांना, मधमाशी पालन आणि त्यासंबंधीच्या व्यवहारांना सूट दिली गेली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी पुस्तके आवश्यक असल्याने पुस्तकांची दुकानेही सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा – लॉकडाऊनच्या काळात हे एप ठरले सर्वाधिक लोकप्रिय आणि महत्वाचे

या सोबतच आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी

  • माननीय मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात इंजिनीअरला झालेल्या मारहाणीचा तपास सीबीआयकडे का देऊ नये; मुंबई उच्च न्यायालयाची विचारणा
  • माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार 27 एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार
  • भारतात आतापर्यंत 21393 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण, तर 681 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू; 4258 कोरोनाग्रस्त उपचारानंतर झाले बरे
  • मागील 14 दिवसात देशातील एकूण 78 जिल्ह्यांमध्ये एकाही व्यक्तीला करोना व्हायरसची लागण झालेली नाही; आरोग्य मंत्रालयाची माहिती
  • कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप प्राथमिक अवस्थेत, विषाणू बराच काळ पृथ्वीवर टिकून राहणार; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
  • महाराष्ट्रात आतापर्यंत 5652 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण, तर 269 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू; 789 कोरोनाग्रस्त उपचारानंतर झाले बरे
  • राज्य सरकारच्या ‘केशरी शिधपात्रिकाधारक कुटुंबांना सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरण’ करण्याच्या निर्णयाची उद्यापासून अंमलबजावणी
  • अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी जीप इंडियाने नवीन ‘BS6’ इंधन मानकांनुसार इंजिन अपडेट असलेली एसयूव्ही ‘कॉम्पास बीएस 6’ केली लाँच
  • वेळोवेळी गुणवत्ता सिद्ध केली असल्याने लोकेश राहुलला कसोटी क्रिकेट संघात स्थान द्या; भारताचा माजी कसोटीपटू दीपदास गुप्ताचा सल्ला
  • अभिनेत्री रिंकू राजगुरूची भूमिका असलेली ‘हंड्रेड’ नावाची वेबसीरिज लवकरच होणार प्रदर्शित; ट्रेलर आणि पोस्टर झाले लॉंच
ऑनलाइन पैसे कमविण्याचा मार्ग