आरोग्य विषयी अत्यंत महत्वाच्या टिप्स ज्या तुमच्या नक्की कामात पडतील
व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी जाणून घ्या ‘हे’ उपाय
अनेकदा सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव असे अनेक आजार होतात. एकमेकांमुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका देखील असतो. अशा इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.
यासाठी खालील टिप्स नक्की पाळा…
तुळशीचा काढा –
तुळस ही एक आयुर्वेदिक औषधी असून, तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तुळशीच्या सेवनामुळे अनेक आजार दूर होतात. तुळशीत अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असते. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पान खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून सुटका होईल.
हळद –
हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. हळद दुधात टाकून पिल्याने व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.
अश्वगंधा –
अश्वगंधामध्ये कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता आहे. हे सर्दी, कफ, ताप अशा आजारांना सहज दूर करते. जर तुम्ही नियमितपणे अश्वगंधाचे सेवन केले तर तुमची रोग प्रतिकारशक्ती नक्कीच वाढेल.
आले –
शरीरातील कफ दूर करण्यासाठी आले गुणकारी ठरते. व्हायरल इन्फेक्शन अथवा कफ, सर्दी, घशात त्रास होत असल्यास आल्याचे गरम सूप अथवा पाणी प्यावे..
आहारात दररोज पनीरचे सेवन केल्याने फायदेशीर ठरू शकते
- भारतीय व्यंजनांमध्ये पनीर स्वादच नव्हे तर आरोग्याचाही पर्याय बनलेला आहे. एक नजर टाकून पनीरच्या पोषक द्रव्यांवर..
- कॅल्शियमचा स्रोत पनीर कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. याच्या नियमित सेवनाने दात आणि हाडे मजबूत राहतात.
- कॅल्शियमव्यतिरिक्त पनीरमध्ये मोठय़ा प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व आढळून येते. हे दातांच्या मुळापर्यंत घर बनवणार्या जंतुंची किंवा कॅव्हिटिजची सुटका करण्यास सक्षम आहे. याचे नियमित सेवन केल्याने आपल्या दातांचे आरोग्य टिकून राहते.
- ज्यांचे वजन कमी आहे त्यांनी विशेषत्त्वाने पनीरचे सेवन केले पाहिजे. यामध्ये असलेली प्रथिने, फॅट आणि मिनरल वजन वाढवण्यास मदत करतात. तसेच प्रथिने व्यक्तीला कर्करोगाच्या धोक्यांपासूनही दूर ठेवतात.
- पनीरचे नियमित सेवन केल्याने रक्त वाढते, लिव्हर मजबूत राहते आणि व्यक्तीला पोषक द्रव्ये शोषून घेण्याची ताकद मिळते.
- वाढत्या वयासोबत उद्भवणार्या समस्यांपासून बचाव करण्यात पनीरची महत्त्वाची भूमिका आहे. पनीरच्या नियमित सेवनाने पाठ आणि सांध्यांशी संबंधित त्रास होत नाही.
वजन कमी करण्यासाठी काही खास उपाय
आपण कितीही जरी डाएट करायचे ठरवले तरी घरात अनेकदा तेलकट, मसालेदार, चमचमीत पदार्थ तयार केले जात असल्यामुळे आपण अशा पदार्थांचा समावेश आहारात करत असतो. पण खरंच तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर फक्त डाएट नाही काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.
आम्ही रिसर्चवर आधारित असलेले वजन कमी करण्याचे काही नवीन उपाय सांगणार आहोत. जे तुम्हाला माहीतही नसतील.
व्यायामाचा अभाव : सकाळचा नाश्ता केल्यानंतर दिवसभर काहीही खाल्ल्याने वजन कमी करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. संध्याकाळच्या जेवणानंतर सकाळच्या नाष्ट्यापर्यंत उपवास केल्याने वजन नियंत्रणात राहते. हा रिसर्च पीएलओएस बायोलॉजी’ यात प्रकाशित झाला आहे. जे वजन कमी होण्यासाठी फायदेशीर असते.
जेवणाची योग्य वेळ : जेवणाच्या योग्या वेळा म्हणजे सकाळी 9 ते 10 आणि संध्याकाळी 7 ते 8 या वेळी जेवण केल्याने शरीर निरोगी राहते. ज्यांना या वेळा पाळणे शक्य आहे, त्यांनी अवश्य या वेळांतच जेवण करावे.
पचनशक्ती : अन्नाचे पचन करण्यासाठी शरीरात पचनशक्ती ही सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असते. रात्री झोपण्यापूर्वी पचन संपूर्ण झालेले असते यासाठी सूर्यास्तानंतर दोन तासांच्या आत जेवण करावे. धावपळीच्या जीवनात लवकर जेवण करणे शक्य नसेल तरी प्रयत्न करून तुम्ही जर लवकरात लवकर जेवाल तर नक्कीच फरक दिसून येईल.
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी खास उपाय:
वाढत्या वयात मधूमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या होऊ नये म्हणून आपण आधीच काळजी घेणे गरजेचे आहे.
तुम्ही आवड म्हणून किंवा एखाद्या पदार्थात मनुके खात असाल आज आम्ही तुम्हाला मनुक्याचे पाणी पिल्याने शरीराला होत असलेल्या फायद्यांबदद्ल सांगणार आहोत.
हृदयरोगापासून सुटका : मनुक्यांच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास रक्तवाहिन्यांमध्ये कॉलेस्ट्रॉल लेवल कमी होते आणि स्ट्रोक, हाय बीपी आणि हार्ट अॅटकपासून वाचू शकतात.
ऍसिडिटीपासून सुटका : रोज रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी पिल्याने गॅस एसिडीटीची समस्या दूर होण्यास मदत होईल. पोट साफ व्यवस्थित होईल.
किडनीस्टोन पासून सुटका : रोज मनुक्याचे पाणी पिल्याने शिरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे किडनी निरोगी राहते. मनुक्यात पोटॅशियम आणि मॅग्निशियम असते.
कमतरतेत वाढ : मनुक्यांच्या पाण्यात आर्यन आणि कॉपर असे. त्यामुळे जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल किंवा एनिमियासारखे आजार झाले असतील तर या पाण्याच्या सेवनाने रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी फायदे होत असतो.
कांदा खाण्याचे काय फायदे आहेत जाणून घ्या
लोकांना अस्थमावर काही घरगुती उपायही जाणून घ्यायचे असतात. अशात आज जाणून घ्या लाल कांद्याचा यात फायदा कसा होतो.
- लाल कांद्यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स तत्व असतात. त्यामध्ये फ्लेवेनॉएड्स आणि एंथोसियानिंस हेही तत्व असतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, लाल कांद्यात जवळपास 25 प्रकारचे एंथोसियानिंस तत्व असतात.
- फ्लेवेनॉएड्सने युक्त असल्याने यात रक्ताला नैसर्गिक रूपाने पातळ करण्याचा गुण असतो. लाल कांद्यात फायटोकेमिकल्स सुद्धा असते ज्याने इम्यून सिस्टीम मजबूत होते.
- लाल कांद्यात व्हिटॅमिन के, बी6 आणि सी भरपूर प्रमाणात असते. तसेच यात फायबरचे प्रमाणही अधिक असते. ज्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. त्यासोबतच यात खनिज पदार्थ, फोलेट, थियामिन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि मॅगनीज असतात.
- लाल कांद्यातील अनेक तत्वांमुळे जसे की, थिओसल्फेट, क्यूसरसेटिन आणि एंथोसियानिन सियानिडिन असते. हे तत्व अॅंटी-ऑक्सिडेंटच्या रूपात असते आणि यानेच लाल कांदा अस्थमावर फायदेशीर ठरतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तुमच्या किचनमधील हे पदार्थ ठरतील उत्तम
सध्या लॉकडाउनमुळे आपण कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी घरीच राहणं योग्य आहे. पण या काळात घरचं आणि पौष्टिक खाणं खाण्यासाठी तुमच्या किचनमध्ये या महत्त्वाच्या वस्तू असणं गरजेच आहे
साधारणपणे किचनमध्ये तांदूळ, डाळ, राजमा, सोयबीन, चने या सारखी कडधान्यं असणं गरजेच आहे. कारण ही तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी पौष्टिक आहेत.
किचनमध्ये काही मसाले जसे की, हळद, धणा पावडर, जीरं, हिंग, लाल मिर्ची पावडर, सुकवलेला कढीपत्ता असायलाच हवेत.
फळ भाज्या : बटाटा, कांदा, टोमॅटो, लसून आणि आलं तसेच काही हिरव्या भाज्या यांचा आहारात समावेश असावा. एंटीबायोटिक आणि विटामिन ‘सी’साठी आलं आणि लसून हे चांगले पर्याय ठरु शकतात.
नाशता : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी शेंगदाणे, भाजलेले चणे, कुरमुरे, पोहे आणि सुखामेवा या सारख्या गोष्टी आणून ठेवा.
पौष्टिक घटक : ओट्स, म्यूसली, अंडी, चीज, रवा आणि बेसन असल्यास उत्तम. आरोग्यासाठी पौष्टिक घटक या पदार्थांतून मिळतात.
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याकरिता खालील 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
आजच्या काळात कुठलेही आजार वयोगट बघत नाही त्या मधून मधुमेह असा आजार आहे जो वडिलांपासून ते मुलांपर्यंत होतो. मधुमेह असल्यास त्याला नियंत्रित करणे महत्वाचे असते.
मधुमेहाला नियंत्रित करण्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला तर घ्याच पण स्वतःहून या गोष्टींचे पालन करा. मधुमेहाला नियंत्रित करा.
1. तांब्याचा भांड्यात पाणी प्या :
तांब्याचा भांड्यात ठेवलेले पाणी पिणे सर्व आजारांसाठी फायदेशीर असते.तांब्याचा भांड्यात कॉपरअँटी ऑक्सीडेन्ट आणि अँटी इंफ्लेमेटरीचे गुणधर्म असतात. जे मधुमेहास नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
2. मेथीदाणे खाणे :
आपण दररोज 10 ग्रॅम मेथीदाणे गरम पाण्यात भिजवून ठेवावे आणि त्याचे सेवन दररोज करावे. असे केल्यास टाइप-2 मधुमेहास नियंत्रित करण्यास मदत होते.
3. मिठाई पासून दूर राहावे :
मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी केवळ मिठाईपासून दूर राहणे पुरेसे नाही तर इतर खाद्यपदार्थात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारलं, कोरफड, आवळा या सारख्या गोष्टींचे सेवन मधुमेहामध्ये फायदेशीर आहे.
झोपण्यापूर्वी गरम पाणी आणि गूळ खाऊन झोपण्याचे आरोग्यदायी फायदे
झोपण्याच्या पूर्वी गूळ आणि गरम पाण्याच्या सेवन केल्याने 4 गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते.
चवीने गोड आणि स्वभावाने गरम असा हा गूळ ज्यात बऱ्याच पौष्टिक घटकांचा समावेश आहे आपल्या शरीरास खूप लाभदायी आहे.
- गुळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, रक्त स्वच्छ होतं, चयापचय क्रिया चांगली राहते. एक ग्लास पाणी किंवा दुधाबरोबर दररोज गूळ सेवन केल्याने पोटात थंडावा वाटतो. यामुळे गॅसचा त्रास नाहीसा होतो.
- जर आपणांस संपूर्ण दिवस थकवा जाणवत असेल तर सकाळी अनोश्या पोटी गूळ नक्की खावा. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढून शरीरातील शुगर पण नियंत्रणात राहते.
- ज्यांना अन्न पचन सहज होत नाही त्यांच्या साठी गूळ आणि गरम पाणी हे रामबाण उपाय आहे.
- खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे अशुद्ध रक्त बनते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त सारख्या आजारांना सामोरा जावं लागतं.
- अशा वेळेस दररोज गुळाचा एक खडा खाऊन गरम पाणी पिण्याने शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते आणि अश्या आजारांपासून मुक्ती मिळते.
नितळ आणि चमकदार त्वचेसाठी घरघुती व नैसर्गिक उपाय
१. भरपूर पाणी प्या :
भरपूर पाणी प्यावे जेणे करून आंतरिक स्वच्छता होऊन शरीरातील घाण बाहेर पडून शरीरात नव्या पेशींची निर्मिती होते. आणि त्वचा तजेल होते.
२. ताजे रस प्या :-
दर रोज कमीत कमी 2 ग्लास ताज्या फलांचा रस प्यायला पाहिजे. रस त्वचेला पोषण देऊन त्वचेला तेजवान आणि सुंदर करते.
३. चांगली झोप :-
आपण नेहमीच कामाच्या ताण तणाव असतो. त्यामुळे थकवा येतो आणि झोप पण पुरेशी होत नसल्याने त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. त्यासाठी किमान 8 तासाची झोप हवी.
४. लिंबू :-
आपल्या आहारात लिंबाचा वापर करावा. लिंबात व्हिटॅमिन सी चा समावेश असतो. व्हिटॅमिन सी शरीरातील घाण बाहेर काढण्यात मदत करंत. लिंबाच्या रसाला सॅलडवर टाकून सेवन करावे किंवा
गरम पाण्यात देखील घेऊ शकता.
५. अक्रोड:-
अक्रोड ह्यात ओमेगा ३ फॅटी एसिड असतं. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. अक्रोडाच्या तेलाने त्वचेवर चांगली मॉलिश केल्याने त्वचेचा रंग उजळून तारुण्य येतं.
६. संत्री :-
संत्रीमुळे त्वचा उजळते. संत्र्याच्या रसाचे सेवन केल्यास त्वचेला फायदा होतो. तसेच संत्र्याच्या सालीची पेस्ट बनवून लावल्याने त्वचा तजेल आणि चमकदार होते.