अनुक्रमणिका
show
आवळा कँडी म्हणलं की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल. त्यातच आता लॉकडाउन असल्याने तूम्ही घरी आहात. मग काय ? लगेच ट्राय करा चटपटीत आरोग्यदायी आवळा कँडी!
साहित्य :
- आवळे-एक किलो
- साखर-साडेतीन कप
कृती :
- आवळे स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घ्यावेत.
- एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे.
- उकळत्या पाण्यात आवळे टाकून पाच ते 10 मिनिटे ठेवावे.
- गॅस बंद करून एका चाळणीत आवळे काढावेत.
- आता सुरीने आवळ्याच्या फोडी सहजतेने होतात. बी काढून टाकावे.
- पूर्ण थंड झाल्यानंतर आवळ्याचे तुकडे आणि तीन कप साखर मिसळून ठेवून द्यावे.
- अधूनमधून हलवत राहावे. दोन ते तीन दिवसांनंतर आवळ्याचे तुकडे जेव्हा भांड्यांच्या तळाशी बसतात, तेव्हा काढून घेऊन चाळणीत घ्यावे.
- द्रव सगळा निथळून गेल्यानंतर उन्हात वाळवावे. पिठीसाखर चाळून पूर्णत: वाळवावे. नंतर हवाबंद डब्यात भरावेत.