आवळा कँडी कशी बनवायची घरच्या घरी जाणून घेऊया

आवळा कँडी कशी बनवायची

आवळा कँडी कशी बनवायची

आवळा कँडी म्हणलं की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल. त्यातच आता लॉकडाउन असल्याने तूम्ही घरी आहात. मग काय ? लगेच ट्राय करा चटपटीत आरोग्यदायी आवळा कँडी!

साहित्य :

  • आवळे-एक किलो
  • साखर-साडेतीन कप

कृती :

  • आवळे स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घ्यावेत.
  • एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे.
  • उकळत्या पाण्यात आवळे टाकून पाच ते 10 मिनिटे ठेवावे.
  • गॅस बंद करून एका चाळणीत आवळे काढावेत.
  • आता सुरीने आवळ्याच्या फोडी सहजतेने होतात. बी काढून टाकावे.
  • पूर्ण थंड झाल्यानंतर आवळ्याचे तुकडे आणि तीन कप साखर मिसळून ठेवून द्यावे.
  • अधूनमधून हलवत राहावे. दोन ते तीन दिवसांनंतर आवळ्याचे तुकडे जेव्हा भांड्यांच्या तळाशी बसतात, तेव्हा काढून घेऊन चाळणीत घ्यावे.
  • द्रव सगळा निथळून गेल्यानंतर उन्हात वाळवावे. पिठीसाखर चाळून पूर्णत: वाळवावे. नंतर हवाबंद डब्यात भरावेत.