उन्हाळ्या मध्ये मुगाची लागवड कशी करावी

उन्हाळ्या मध्ये मुगाची लागवड कशी करावी

उन्हाळ्या मध्ये मुगाची लागवड कशी करावी

उन्हाळ्या मध्ये मुगाची लागवड करायचे म्हटले तर याचे आपण भरपूर उत्पादन घेऊ शकतो. स्वच्छ सूर्यप्रकाश व उष्ण हवामान यामुळे उन्हाळ्यात मुगाचे पिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. उन्हाळ्यामध्ये मुगाच्या लागवडी वर किडांचा व रोगांचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात म्हणजे कमी असतो. सिंचनाची सुविधा असल्यास उन्हाळ्यात मुगाचे चांगले उत्पन्न मिळू शकते. मुगाच्या शेंगा साधारण 60 ते 65 दिवसांत तोडणीस येतात.

हवामान कसे असावे:

मूग पीक खरिप हंगामात घेतला जातो, मात्र सिंचन सुविधा व सुधारित जातीमुळे उन्हाळ्यातही वैशाखी मूग म्हणून लागवड केली जाते. हे पीक उष्ण हवामानात चांगले येते. साधारणपणे 21 ते 35 अंश तापमानात मुगाची चांगली वाढ होते.

जमीन कशी असावी:

मध्यम ते भारी जमिनीत मूग चांगला येतो; जमीन चांगली निचऱ्याची असावी. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण चांगले असावे. थंडीचा कमी झाल्यानंतर मूग पेरणी फेब्रुवारीअखेर ते मार्च महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यान करावी. उशिरा पेरणी केल्यास जून-जुलैच्या पावसात काढणीला येते.

लागवड व व्यवस्थापन कसे करावे:

पेरणीपूर्वी रान ओले करून वापश्यावर आल्यानंतर पेरणी करावी. उन्हाळी मुगास पेरणीनंतर प्रथम तीन ते चार दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे. पहिल्या हलक्‍याशा पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे व गरजेनुसार 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. एकूण पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या पिकाच्या संपूर्ण कालावधीत द्याव्यात. तुषार सिंचनाचा वापर करून मूग भिजविल्यास अधिकच फायदा होतो.

भुरी व करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव मुगावर येऊ शकतो. रोग नियंत्रणासाठी 2.5 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक किंवा 1 ग्रॅम कार्बेंडाझिम प्रति लिटर पाण्यातून फवारावे.

मुगाची काढणी केव्हा करावी व किती उत्पादन होईल :

उन्हाळी मूग 60 ते 65 दिवसांत काढणीस येतो. जवळजवळ 70 ते 75 टक्के शेंगा तयार होऊन वाळल्यावर पहिली तोडणी करावी. तयार शेंगा 2 ते 3 तोड्यांमध्ये तोडून घ्याव्या. 4 ते 5 क्विंटल प्रति एकरी मूग उत्पादन मिळू शकते.

ऑनलाइन पैसे कमविण्याचा मार्ग