उन्हाळ्या मध्ये सोयाबीन लागवड कशी करावी

उन्हाळ्या मध्ये सोयाबीन लागवड कशी करावी

उन्हाळ्या मध्ये सोयाबीन लागवड कशी करावी

उन्हाळी सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वत्र घेतले जाते. कडधान्य म्हणून आणि प्रक्रिया करून देखील वापरले जाते.

जमीन कशी असावी:

उन्हाळी सोयाबीनची लागवड 4.5 ते 8.5 च्या पीएच (सामु) असलेल्या जमिनीत केल्यास चालते. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत लागवड करू नये. जमिनीत सेंद्रिय कार्बनी मात्रा चांगल्या प्रमाणात असावी .

हवामान कसे असावे:

सोयाबीन उष्ण हवामान या पिकास चांगले मानवते. तापमान 18 ते 35 अंश से.ग्रे. मध्ये पिकाची वाढ चांगली होते. मुख्यत्वे सोयाबीन खरीप हंगामात घेतात. पिकास वार्षिक 600 ते 1 हजार मी.मी. पर्जन्यमानाची आवश्यकता असते.

लागवड कशी करावी:

मान्सुन व्यवस्थित स्थिर झाल्यानंतरच सोयाबीनची लागवड करावी. सोयाबीनची लागवड जुन ते जुलै महिन्यात केली जाते. 1 एकरात पेरणीसाठी 30 ते 40 किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीतील अंतर हे दोन ओळीत 75 से.मी. व 2 रोपांमध्ये 10 .सें.मी. ठेवावे.

पाणी व्यवस्थापन कसे करावे:

याबीनमध्ये रोप, फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याच्या तणास संवेदनशील आहेत. या कालावधीत 15-20 दिवसात पाऊस कमी झाल्यास पिकाला पाणी द्यावे.

किती उत्पादन मिळू शकेल :

पिकाचे उत्पादन त्याच्या वाणावर अवलंबून असते साधारण 18 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.