सरकारने कर्जमाफी विषयी घेतलेला निर्णय योग्य कि अयोग्य?

महाराष्ट्र राज्य सरकारने कर्जमाफी विषयी घेतलेला निर्णय योग्य कि अयोग्य

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या लेखामध्ये आम्ही तुम्हाला शेतकरी कर्जमाफी बद्दल काही थोडक्यात महत्वाचे राज्य सरकारने घेतलेले २०१७ साली घेतलेले निर्णय आणी ते कशासाठी घेतले असावे हे तुमच्यासमोर एक प्रश्न आणि उत्तराच्या आधारे मांडत आहे ते खालील प्रमाणे

प्रश्न :- महाराष्ट्र राज्य सरकारने कर्जमाफी अर्ज भरण्याकरिता आधार कार्ड सोबत प्रत्येक कर्ज धारकाला आपला स्वतःचा अंगुठा देऊन अर्ज का भरून घेण्यात आला असावा?

उत्तर :- महाराष्ट्र राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर करण्याच्या अगोदर त्यांनी भरपूर अभ्यास करून हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय फायद्याच्याच आहे. ते सविस्तर जाणून घेऊयात.

शेतकरी कर्जमाफी देण्याकरिता राज्य सरकारने जी योजना आणली तिचे नाव छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ असून या योजने अंतर्गत सर्व शेतकरी बांधव ज्यांनी आपल्या शेतीवर कर्ज काढले असणार त्यांच्यासाठी हि योजना आहे. या योजने करीता सर्व कर्जधारक यांनी आपला अर्ज भरून शेतकरी कर्जमाफी चा लाभ घ्यावा अशे आवाहन करण्यात आले होते. मग जवळपास सर्व शेतकऱ्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली व त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले , जशे वेबसाईट बंद पडणे, आधार कार्ड नसणे , अंगुठा म्याच न होणे , सेवा केंद्रांवरची गर्दी , अश्या खूप समस्यांना शेतकरी बांधवांना सामोरे जावे लागले.

पण शेतकरी मित्रांनो तुम्ही हा त्रास सहन केला हे मला पण मान्य आहे आणि आणखी तुमच्या समस्या म्हणजे कर्जमाफी ची सदर रक्कम थेट आमच्या बँक खात्यामध्ये जमा का नाही केली? हा प्रश्न तुम्हा सर्वांना नक्की पडला असणारच पण तुमच्या जवळून ऑनलाईन फॉर्म भरून घेण्या मागचे मुख्य कारण तरी काय आहे? हे आपण सविस्तर जाणून घेतले तर बर होईल .

शेतकरी बांधवांकडून कर्जमाफी करीता ऑनलाईन फॉर्म या करीता भरून घेण्यात आले कारण, जश्या प्रकारे तुमचे बँकेमध्ये बँक खाते आहे आणि तुम्ही त्यावर बँके मधून तुमच्या शेतीसाठी कर्ज उचलले आहे, त्याच प्रकारे काही बँकांमध्ये चुकीचे नाव बनवून खोटे बँक खाते उघडून त्या नावावर शेतकरी कर्जासाठी भरपूर रक्कम उचलण्यात आली असावी. व ती कर्जाची रक्कम जर आपण कर्जमाफी मध्ये जाहीर करून त्याचा बँक खात्या मध्ये जमा केली तर ती रक्कम खोट्या नावाने असलेले बँक खाते यामध्ये जमा होऊन जाईल व चुकीच्या व्यक्तीला या शेतकरी कर्जमाफी चा लाभ होईल आणि अशाप्रकारे शासनाचा खूप मोठा निधी चुकीच्या व्यक्तीला जो आपली सर्वांची फसवणूक करून ज्याने कर्ज काढले असणार त्या व्यक्तीला याचा फायदा होईल. हे सर्व थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून ज्या व्यक्तीचे खाते बँकेमध्ये आहे त्याचे व्यक्तीचे आधार कार्ड आणि त्याचा स्वतःचा अंगठा याचा माध्यमातून तुमचे सर्वांचं बँक खाते पडताळण्यात आले. तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफी झालेली रक्कम जमा करण्यात आली. अश्याप्रकारे फक्त जे खरे शेतकरी मित्र आहेत ज्यांनी आपल्या शेतीसाठी कर्ज घेतले त्यांनाच हा लाभ देण्यात आला आणि ज्यांनी शासनाची फसवणूक करून बँके मधून शेतीसाठी चुकीच्या मार्गाने कर्ज काढले असेल अश्यांना शेतकरी कर्जमाफी चा लाभ मुळीच मिळणार नाही.

तर माझे शेतकरी बांधव तुम्हाला आमचा हा लेख आवडला असणारच अशी आम्ही आशा बाळगतो , आणि तुम्ही हा माझा लेख माझा सर्व शेतकरी बांधवांपर्यन्त नक्की पोहचवा कारण त्यांना झालेल्या गैरसमजमुळे त्यांनी हा लेख वाचला तर त्यांना असलेला गैरसमज नक्कीच दूर होईल. आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ अंतर्गत होणाऱ्या शेतकरी कर्जमाफी लाभाकरीता ते स्वतंत्रपणे तयार असतील. आणि एक दिवस का होईना पण ज्यांचे नाव अजून कर्जमाफी लाभार्थी यादी मध्ये आले नसतील त्यांचे सुद्धा येतील.

तर शेतकरी मित्रांनो मी तुमच्याच सोयीसाठी शासनाने एक अत्यंत सोपी आणि वापरायला अगदी सोपे आणि सहज अशी एक वेबसाईट बनवली आहे (https://csmssy.mahaonline.gov.in/) या वेबसाईट च्या माध्यमातून तुम्ही शासनाने जी वेळोवेळी शेतकरी कर्जमाफी लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येईल ती तुमच्या पर्यंत या वेबसाईट च्या माध्यमातून पोहचत राहील आणि तुम्ही ती केव्हा पण पाहू शकणार तर तुम्ही या वेबसाईट चे नाव आपल्या डायरी मध्ये नक्की लिहून ठेवा. व तसेच आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा हि माहिती पाठवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद