काकडी ची लागवड कशी करायची

काकडी ची लागवड कशी करायची

काकडी ची लागवड कशी करायची

काकडी हे भारतीय पिक असल्‍याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 3711 हेक्‍टरवर या पिकाची लागवड होते. काकडी पासून लोणचे, सॅलेड, कोशिंबीर असे बनविले जाते. या पिकाला वर्षभर मागणी असते. भारतामध्ये खानदेश, विदर्भ, नंदुरबार, मराठवाडा, मद्रास, ओरिसा, कर्नाटक या भागांमध्ये काकडीची मुखतः लागवड केली जाते.

जमीन कशी असावी:

पाण्याचा उत्तम निचरा होणारी माध्यम,काळी जमीन यासाठी योग्य असते.

हवामान कसे असावे:

काकडी हे उष्‍ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक आहे.

काकडी च्या वेगवेगळ्या जाती :

शाईन, हिमांगी, फुले शुभागी, मालिनी, शीतल वाण, पुना खिरा, प्रिया, पुसा संयोग आदी.

लागवड कशी करावी:

प्रतिकिलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. बियाणे सावलीत वाळवून त्यानंतर प्रति 10 किलो बियाणास रायझोबियम जीवाणू संवर्धकाची 250 ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी. हेक्‍टरी 2.5 ते 4 किलो बियाणे वापरावे. नांगरट करून शेणखत 30 ते 40 गाड्या शेणखत टाकावे व बेड किंवा सरीवर 1 ते 1.5 मीटर अंतरावर एका ठिकाणी 2 बिया रोवून लागवड करावी.

खत व्यवस्थापन कशे करावे:

लागवडीपूर्वी जमिनीत 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश लागवडीच्या आधी दयावे.

पाणी कश्याप्रकारे द्यावे :

या पिकाला पाणी पावसाळ्यात 8 ते 10 दिवसांनी, हिवाळ्यात 4 ते 5 दिवसांनी व उन्हाळ्यात 2 ते 3 दिवसांनी मगदूरानुसार पाणी दयावे.

किती उत्पादन मिळू शकेल :

फळाची काढणी ही फळे कोवळी असतानाच करावी. दर 2-4 दिवासांनी तोडणी करावी. सरासरी उत्पादन 200 ते 400 क्विंटल मिळते.

ऑनलाइन पैसे कमविण्याचा मार्ग