कोबी पिकाची लागवड कशी करावी

कोबी पिकाची लागवड कशी करावी

कोबी पिकाची लागवड कशी करावी

कोबी पिकाची लागवड करायची असेल तर बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कोबी पिकाच्या जातींची लावणी करावी. आधुनिक व सुधारित पद्धतीने लावणी केल्याने चांगल्याप्रकारे उत्पादन मिळू शकते. कोबी च्या पिकांच्या वाढीसाठी नदीकाठाची गाळाची जमीन, पाण्याचा उत्तम निचरा, काळी, रेताड ते मध्यम  असणारी जमीन निवडावी व तसेच जमिनीचा सामू हा 5.5 ते 6.5  ठेवल्यास ही पिके चांगल्याप्रकारे येतात.

बियाणे किती घ्यावे:

कोबी, फ्लॉवर व ब्रोकोली या पिकांच्या लागवडीसाठी हेक्‍टरी 600 ते 700 ग्रॅम बियाणे पुरेसे होते. नवलकोलचे हेक्‍टरी एक ते दीड किलो बी पुरेसे होते.

रोपनिर्मिती कशी करावी:

कोबी ची रोपनिर्मिती करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत केल्यानंतर बी पेरणीसाठी 3 मीटर लांब व १ मीटर रुंद व 15 ते 20 सें.मी. उंचीचे गादी वाफे तयार करावेत. 30 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड, प्रत्येक गादी वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत दोन घमेली, 100 ग्रॅम मिश्रखत मातीत चांगले मिसळून घ्यावे. रुंदीशी समांतर 10 सें.मी. अंतरावर रेषा पाडून 1 ते 1.5 सें.मी. खोलीवर बियांची पातळ पेरणी करून मातीने बियाणे झाकून घ्यावे. बियाण्याची उगवण होईपर्यंत गरजेनुसार सकाळी व संध्याकाळी झारीने पाणी द्यावे. 10 ते 12 दिवसांच्या अंतराने बी उगवल्यानंतर  पाणी द्यावे. कीड, रोगाच्या प्रादुर्भावानुसार फवारणीचे नियोजन करावे. रोपे चार आठवड्यांत पुनर्लागवडीसाठी तयार होतात.

लागवड कशी करावी:

जमिनीच्या लागवडीसाठी सपाट वाफे तयार करून घ्यावे. जमिनीची मशागत केल्यानंतर शेवटच्या पाळीपूर्वी चांगल्याप्रकारे कुजलेले शेणखत प्रति हेक्‍टरी 20 ते 25 टन  या प्रमाणात चांगले पसरून घ्यावे.

पुनर्लागवड कशी करावी :

कोबीची लागवड 45 सें.मी. x 30 सें.मी. अंतरावर करावी.

पाणी व खत व्यवस्थापन कसे करावे:

कोबीवर्गीय पिकांचीमुळे उथळ असल्यामुळे पाणी नियमित द्यावेत. कोबीचा गड्डा तयार होण्यावेळी पाण्याचा पुरवठा कमी पडल्यास गड्डे लहान राहतात.

कोबी पिकासाठी हेक्‍टरी 180 किलो नत्र, 80 किलो स्फुरद, 80 किलो पालाश असे खत द्यावे. नत्राची मात्रा लागवडीनंतर व लागवडीवेळी  तीस दिवसांनी दोन सारख्या हप्त्यांत विभागून घ्यावे.

कोबी पिकाची काढणी केव्हा करावी:

जातीपरत्‍वे कोबी अडीज ते 3 महिन्‍यात तयार होते. कोबीचे हेक्‍टरी उत्‍पादन 180 ते 200 क्विंटल आरामात घेता येऊ शकते.

ऑनलाइन पैसे कमविण्याचा मार्ग