स्पर्धा परीक्षा जनरल नाॅॅलेज प्रश्न आणि उत्तर

स्पर्धा परीक्षा जनरल नाॅॅलेज प्रश्न आणि उत्तर

प्रश्न : ‘जागतिक चिमणी दिन 2020’ ची संकल्पना काय आहे?
उत्तर : आय लव्ह स्पॅरोज

प्रश्न : ऊर्जा वित्त महामंडळाचे (PFC) नवे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
उत्तर : रवींदर सिंग ढिल्लोन

प्रश्न : कोणत्या दिवशी आयुध निर्माण कारखाना दिवस साजरा केला जातो?
उत्तर : 18 मार्च

प्रश्न : “टेक फॉर ट्राइबल” उपक्रम कुणाकडून सुरू करण्यात आला आहे.
उत्तर : भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED)

प्रश्न : भारताने लाइट मशीन गन या बंदुकींच्या खरेदीसाठी कोणत्या देशासोबत 880 कोटी रुपयांचा करार केला?
उत्तर : इस्त्राएल

प्रश्न : कोणती पेमेंट बँक त्यांच्या ग्राहकांना ‘व्हिसा डेबिट कार्ड’ प्रदान करणार आहे?
उत्तर : पेटीएम पेमेंट्स बँक

प्रश्न : कोणत्या संस्थेकडून ‘स्वावलंबन एक्सप्रेस’ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली?
उत्तर : भारतीय लघोद्योग विकास बँक (SIDBI)

प्रश्न : 5व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : नंद किशोर सिंग

प्रश्न : 21 मार्च 2020 रोजी पाळण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वन दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : फॉरेस्ट अँड बायोडायव्हरसिटी

प्रश्न : “माय एन्काऊंटर्स इन पार्लीमेंट” हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : भालचंद्र मुणगेकर

प्रश्न : भारतातल्या गुगल क्लाऊड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोण आहे?
उत्तर : करण बाजवा

प्रश्न : सिंगापूरमध्ये होणाऱ्या ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ याचा विषय काय आहे?
उत्तर : लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अ‍ॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड

प्रश्न : कोणत्या कंपनीच्या सहकार्याने “इनोव्हेट फॉर अॅक्सेसीबल इंडिया’ ह्या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला?
उत्तर : मायक्रोसॉफ्ट

प्रश्न : ‘इनव्हिन्सिबल – ए ट्रिब्यूट टू मनोहर पर्रीकर’ शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : तरुण विजय

प्रश्न : ‘रोड सेफ्टी मीडिया फेलोशिप अवॉर्ड 2019’ कुणाला देण्यात आला?
उत्तर : प्राची साळवे

प्रश्न : कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2020 सालाच्या जागतिक आनंद अहवालामध्ये प्रथम स्थान पटकवले?
उत्तर : फिनलँड

प्रश्न : ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’मध्ये कोणत्या संस्थेला वैधानिक संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे?
उत्तर : नागरी उड्डयण महासंचालनालय आणि नागरी उड्डयण सुरक्षा विभाग

प्रश्न : कोणत्या ठिकाणी ‘2020 उन्हाळी ऑलम्पिक’ आयोजित करण्याचे नियोजित आहे?
उत्तर : टोकियो, जापान

प्रश्न : “आफ्रिकन लायन” हा कोणत्या दोन देशांदरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका आणि मोरोक्को

प्रश्न : कोणत्या ठिकाणांदरम्यान नवी सागरी रोपॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे?
उत्तर : मुंबई आणि मांडवा

प्रश्न : कोबे ब्रायंट यांना कोणत्या देशातल्या नेस्मिथ मेमोरियल बास्केटबॉल हॉल ऑफ फेममध्ये मरणोत्तर सामील करण्यात आले आहे?
उत्तर : अमेरिका

प्रश्न : दरवर्षी 07 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. 2020 या वर्षाची संकल्पना काय आहे?
उत्तर : सपोर्ट नर्स आणि मिडवाईव्ह्ज

प्रश्न : क्रिकेटमध्ये वापरली जाणारी DLS पद्धत कोणी तयार केली?
उत्तर : टोनी लुईस

प्रश्न : नौदलाचे कोणत्या डॉकयार्डमधील कर्मचार्‍यांनी ‘पोर्टेबल मल्टी-फीड ऑक्सीजन मॅनिफोल्ड’ यंत्रणा विकसित केली?
उत्तर : विशाखापट्टणम

प्रश्न : NASSCOM संस्थेचे नवे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : प्रवीण राव

प्रश्न : कोणत्या कंपनीने 07 एप्रिल 2020 रोजी खासगी क्षेत्रातल्या इंडसइंड बँकेमधला 0.85 टक्के हिस्सा खरेदी केला?
उत्तर : UBS प्रिन्सिपल कॅपिटल एशिया

प्रश्न : ‘17 वर्ष वयोगटातील महिलांचा FIFA विश्वचषक’ स्पर्धा कोणत्या देशात घेण्याचे नियोजित होते?
उत्तर : भारत

प्रश्न : कोणत्या दिवशी प्रथम ‘आंतरराष्ट्रीय विवेक दिन’ पाळला गेला?
उत्तर : 5 एप्रिल 2020

प्रश्न : कोणत्या कलमान्वये ‘PM-CARES निधी’ ला प्राप्तिकरातून सूट देण्यात आली आहे?
उत्तर : कलम 80 (G)

प्रश्न : कोणत्या संस्थेनी ‘बायो सूट’ विकसित केला?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

प्रश्न : भारताने कोणत्या देशासोबत ‘कार्गो-एअर-ब्रिज’ याची स्थापना केली?
उत्तर : चीन

प्रश्न : कोणत्या मंत्रालयाने “कोविड 19 फॅक्ट चेक युनिट” पोर्टल कार्यरत केले?
उत्तर : माहिती व प्रसारण मंत्रालय

प्रश्न : कोणत्या संस्थेनी ‘जीवन लाइट’ पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार केले?
उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद

प्रश्न : ब्रह्म कांचीबोटला कोण होते?
उत्तर : पत्रकार

प्रश्न : कोणता देश ‘2020 FIFA अंडर-17 महिला फुटबॉल विश्वचषक’ आयोजित करणार आहे?
उत्तर : भारत

प्रश्न : आंतरराष्ट्रीय भूस्पोटक (माइन) जनजागृती आणि भूस्पोटक कृतीमध्ये मदत दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : टुगेदर फॉर माइन अॅक्शन

प्रश्न : कोणत्या गटाने ‘करुणा’ या नावाने एक उपक्रम आरंभ केला?
उत्तर : केंद्रीय नागरी सेवा अधिकारी

प्रश्न : कोणत्या योजनेच्या अंतर्गत कोविड-19 वरील चाचणी व उपचार मोफत होणार?
उत्तर : आयुष्मान भारत योजना

प्रश्न : कोणत्या संस्थेनी ‘चॅलेंज कोविड-19’ स्पर्धेची घोषणा केली?
उत्तर : नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन

प्रश्न : ‘ऑपरेशन संजीवनी’ अंतर्गत भारतीय हवाई दल कोणत्या देशाकडे आवश्यक औषधांची वाहतूक करीत आहे?
उत्तर : मालदीव

प्रश्न : BCG लसीचा उपयोग कोणत्या रोगाविरूद्ध केला जातो?
उत्तर : क्षयरोग

प्रश्न : ‘कोरोना केअर’ विमा सादर करण्यासाठी ‘फोन पे’ कंपनीने कोणत्या विमा कंपनीबरोबर भागीदारी केली?
उत्तर : बजाज अलियान्झ

प्रश्न : कोणत्या मंत्रालयाने ‘हॅक द क्रायसेस इन इंडिया’ नावाची ऑनलाइन हॅकेथॉन स्पर्धा आयोजित केली?
उत्तर : इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

प्रश्न : ‘वर्ल्ड गेम्स 2022’ या स्पर्धा कुठे खेळवल्या जाणार आहेत?
उत्तर : अल्बामा, अमेरिका

प्रश्न : कोणती संस्था ‘कवच’ केंद्र चालवत आहे?
उत्तर : सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंत्रेप्रेन्योरशिप

प्रश्न : कोणत्या संस्थेनी ‘NCC योगदान’ सराव आरंभ केला?
उत्तर : नॅशनल कॅडेट कॉर्प्स

प्रश्न : फलंदाज आणि यष्टीरक्षक राहिलेले जॅक एडवर्ड्स कोणत्या देशाचे होते?
उत्तर : न्युझीलँड

प्रश्न : कोणते पोर्ट ट्रस्ट ‘सक्तीची अनिश्चित परिस्थिती’ घोषित करणार पहिला सरकारी बंदर ठरला?
उत्तर : कोलकाता पोर्ट ट्रस्ट

प्रश्न : कोणते सार्वजनिक ठिकाणी ‘फेस मास्क’ अनिवार्य करणारे पहिले शहर ठरले आहे?
उत्तर : मुंबई

प्रश्न : कोणत्या शहरात ‘आशियाई युवा खेळ 2021’ या स्पर्धांचे आयोजन होणार?
उत्तर : शान्ताउ, चीन

प्रश्न : जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीशपदी कोण आहे?
उत्तर : न्यायमूर्ती रजनेश ओसवाल

प्रश्न : वर्ष 2020 याच्या ‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : सेफ मदरहूड इन टाइम्स ऑफ कोविड-१९

प्रश्न : कोणत्या देशात ‘अनाक क्राकाताऊ’ ज्वालामुखी आहे?
उत्तर : इंडोनेशिया

प्रश्न : कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय रोमानी दिन साजरा केला जातो?
उत्तर : 8 एप्रिल

प्रश्न : कोणत्या मंत्रालयाने ‘YUKTI’ संकेतस्थळ सुरू केले?
उत्तर : मनुष्यबळ व विकास मंत्रालय

प्रश्न : ‘फोर्ब्स’ मासिकाने कोणत्या व्यक्तीला ‘सर्वात श्रीमंत व्यक्ती’चा किताब दिला?
उत्तर : जेफ बेझोस

प्रश्न : कोणत्या संस्थेनी “आय स्टँड विथ ह्यूमॅनिटी” मोहीम चालवली?
उत्तर : आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन

प्रश्न : कोणत्या राज्य सरकार वा केंद्रशासित प्रदेशाने ‘ऑपरेशन SHIELD’ कार्यक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : दिल्ली

प्रश्न : महिला गटात ‘लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड 2020’ हा किताब कोणाला देण्यात आला?
उत्तर : एलिस पेरी

प्रश्न : NASA संस्थेची कोणती मोहीम ‘सक्सेसफूल फेल्युअर’ या नावाने ओळखली जाते?
उत्तर : अपोलो 13

प्रश्न : कोणत्या राज्यात पेंच व्याघ्र प्रकल्प आहे?
उत्तर : मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र

प्रश्न : कोणत्या दिवशी जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो?
उत्तर : 10 एप्रिल

ची पहिली मोहीम कोणत्या प्रयोगशाळेकडून आरंभ करण्यात आली आहे?
उत्तर : डॉ. डॅंग्स लॅब

प्रश्न : कोणती संस्था चंद्रावर ‘आर्टेमिस बेस कॅम्प’ स्थापन करणार आहे?
उत्तर : नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन

प्रश्न : कोणत्या संस्थेनी ‘पर्सनल सॅनिटायझेशन एनक्लोजर’ या नावाने शरीर निर्जंतुकीकरण कक्ष विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

प्रश्न : 2020 या वर्षी राष्ट्रीय सागरी दिनाची संकल्पना काय होती?
उत्तर : सस्टेनेबल शिपिंग फॉर सस्टेनेबल प्लॅनेट

प्रश्न : कोणता घटक अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या ‘5T’ योजनेचा भाग नाही?
उत्तर : टेस्टिफाय

प्रश्न : कोणती व्यक्ती परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ता आहेत?
उत्तर : अनुराग श्रीवास्तव

प्रश्न : ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालय, जेथे ‘नादिया’ वाघ कोविड-19 विषाणूने संक्रमित झाला, ते कोणत्या देशात आहे?
उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका

प्रश्न : कोणत्या दिवशी ‘विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिडा दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : 6 एप्रिल

प्रश्न : कोणती संस्था कोविड-19 जीनोम सीक्वेन्सिंग प्रक्रिया चालविणारी भारतातली द्वितीय संस्था ठरली?
उत्तर : गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर

प्रश्न : निधन झालेल्या जीन डिच यांनी कोणत्या कार्टून मालिकेचे दिग्दर्शन केले होते?
उत्तर : टॉम अँड जेरी

प्रश्न : भारतात कोविड-19 तपासणी

प्रश्न : कोणत्या आशियाई देशाने कोरोना विषाणू महामारीमुळे देशात आणीबाणी घोषित केली?
उत्तर : जापान

प्रश्न : कोणत्या कंपनीने ‘नियरबाय स्पॉट’ अॅप सादर केले?
उत्तर : गूगल

प्रश्न : कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी ‘स्टेट ऑफ वर्ल्ड्स नर्सिंग रिपोर्ट 2020’ अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

प्रश्न : कोणते जगातले अत्यल्प काळात 50 दशलक्ष डाउनलोड प्राप्त करणारे अॅप आहे?
उत्तर : आरोग्य सेतू

प्रश्न : कोणत्या मंत्रालयाच्या वतीने ‘देखो अपना देश’ वेबिनार कार्यक्रम आरंभ करण्यात आला आहे?
उत्तर : पर्यटन मंत्रालय

प्रश्न : कोविड-19 याच्या संदर्भात संपूर्ण माहिती प्रदान करण्यासाठी कोणत्या संस्थेनी ‘कोविड FYI’ संकेतस्थळ तयार केले?
उत्तर : IIM कोझिकोड

प्रश्न : कोणते राज्य कोविड19 जलद चाचणी पद्धतीचा अवलंब करणारे देशातले पहिले राज्य ठरले?
उत्तर : राजस्थान

प्रश्न : कोणत्या व्यक्तीला ‘WWF इंडिया’ या संस्थेचा दूत म्हणून नेमण्यात आले आहे?
उत्तर : विश्वनाथन आनंद

प्रश्न : कोणत्या संस्थेनी ‘पुसा डीकंटॅमिनेशन टनेल’ विकसित केले?
उत्तर : भारतीय कृषी संशोधन संस्था

प्रश्न : कोणत्या व्यक्तीला ‘इंटरनॅशनल प्राइज फॉर अरबी फिक्शन 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : अब्देलौहब एसाओई

प्रश्न : कोणता देश ‘आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2020’ या स्पर्धेचे आयोजन करणार आहे?
उत्तर : भारत

प्रश्न : कोणत्या संस्थेनी ‘COVSACK कक्ष’ विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

प्रश्न :  कोणत्या मंत्रालयाच्या वतीने ‘अखिल भारतीय कृषि परिवहन कॉल सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

प्रश्न : कोविड-19 महामारीमुळे रद्द केलेला ‘टूर डी फ्रान्स’ कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : सायकल शर्यत

प्रश्न : कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकावासीला ‘गुगेनहेम फेलोशिप 2020’ प्रदान करण्यात आली नाही?
उत्तर : संदीप दास

प्रश्न : “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स” याची स्थापना करण्याची शिफारस केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : एम. एस. साहू

प्रश्न : कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?
उत्तर : हैदराबाद

प्रश्न : कोणत्या शहराने ‘स्मार्ट शहरे’ अभियानाच्या अंतर्गत ‘सय्यम’ अॅप तयार केले?
उत्तर : पुणे

प्रश्न : कोणत्या मंत्रालयाने ‘सहयोग’ मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले?
उत्तर : विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

प्रश्न : कोणत्या व्यक्तीने ‘बांग्ला दिनदर्शिका’ प्रस्तुत केली?
उत्तर : अकबर

प्रश्न : कोणत्या संरक्षण संस्थेनी ‘एअर इव्हॅक्युएशन पॉड’ विकसित केले आहे?
उत्तर : भारतीय नौदल

प्रश्न : कोणत्या संस्थेनी स्वयंचलित ‘मिस्ट बेस्ड सॅनिटायझर डिस्पेन्सिंग युनिट’ हे उपकरण विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

प्रश्न : केंद्र सरकारने नेमलेल्या कोविड19 साठीच्या उच्चस्तरीय कृती दलाचे नेतृत्व कोणाकडे दिले गेले आहे?
उत्तर : विनोद पॉल आणि के. विजयराघवन

प्रश्न : कोणत्या शैक्षणिक संस्थेनी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘फिट इंडिया’ चळवळीसोबत भागीदारी केली?
उत्तर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ

प्रश्न : कोणती मोहीम IFFCO संस्थेच्या वतीने घेतला गेलेला पुढाकार आहे?
उत्तर : ब्रेक द कोरोना चेन

प्रश्न : कोणत्या राज्याने ‘फूड बँक’ उपक्रम राबविण्यास सुरुवात केली?
उत्तर : मणीपूर

प्रश्न : कोणत्या नियंत्रण मंडळाने ‘OBICUS’ कार्यक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)

प्रश्न : ‘चित्रा GeneLAMP-N’ काय आहे?
उत्तर : कोविड-19 नैदानिक उपकरण

प्रश्न : कोणत्या मंत्रालयाने मंजुरांच्या वेतनासंबंधी तक्रारींच्या निराकरणासाठी वीस नियंत्रण कक्षांची स्थापना केली?
उत्तर : कामगार व रोजगार मंत्रालय

प्रश्न : कोणत्या राज्यात ‘पुथंडू’ सण साजरा करतात?
उत्तर : तामिळनाडू

प्रश्न : कोणत्या राज्य सरकारचा ‘आयू’ अॅपसोबत करार झाला आहे?
उत्तर : राजस्थान

प्रश्न : कोणत्या कंपनीने “प्लाझ्मा बॉट” उपकरण तयार केले?
उत्तर : मायक्रोसॉफ्ट

प्रश्न : कोणत्या कंपनीने नेत्रहीन लोकांसाठी “टॉकबॅक” कीबोर्ड विकसित केले आहे?
उत्तर : गुगल

प्रश्न : ‘जिओटॅग’ प्राप्त सामुदायिक स्वयंपाकगृह असलेले देशातले पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर : उत्तरप्रदेश

प्रश्न : कोणत्या व्यक्तीने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी ‘सप्तपदी’ कार्यक्रमाची घोषणा केली?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रश्न : कोणत्या देशाने भारताला जहाज-रोधी हार्पून क्षेपणास्त्र आणि टॉरपीडो विक्री करण्याला मंजुरी दिली?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

प्रश्न : कोणत्या औद्योगिक संस्थेनी ‘एक्झिट फ्रॉम द लॉकडाउन’ अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : भारतीय उद्योग संघ (CII)

प्रश्न : कोणत्या कंपनीने ‘नियरबाय स्पॉट’ अॅप सादर केले?
उत्तर : गूगल

प्रश्न : कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी ‘स्टेट ऑफ वर्ल्ड्स नर्सिंग रिपोर्ट 2020’ अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

प्रश्न : कोणत्या व्यक्तीची युनियन बँक ऑफ इंडिया याचे चौथे कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक झाली?
उत्तर : बीरुपक्ष मिश्रा

प्रश्न : आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन (IWF) चे कार्यवाह अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : उर्सुला पापंड्रिया

प्रश्न : 2020 या वर्षासाठी जागतिक पुस्तक दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : शेयर ए मिलियन स्टोरीज

प्रश्न : कोणत्या राज्य सरकारने ‘सुजलाम सुफलाम जलसंचय अभियान’ आरंभ केले?
उत्तर : गुजरात

प्रश्न : 2020 या सालाचा ‘विल्यम ई. कोल्बी पुरस्कार’ कुणी जिंकला?
उत्तर : अ‍ॅडम हिगिनबॉथम

प्रश्न : ‘किसान रथ’ अॅपचे कार्य काय आहे?
उत्तर : अन्नधान्यांच्या वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे

प्रश्न : 2020 साली जागतिक आवाज दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : फोकस ऑन युवर वॉइस

प्रश्न : हांग्जो शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘2022 एशियन पॅरा गेम्स’या स्पर्धांचे शुभंकर काय आहे?
उत्तर : फीफी

प्रश्न : भारतीय भुदलाच्या कोणत्या मोहिमेच्या स्मृतीत सियाचीन दिन साजरा केला जातो?
उत्तर : ऑपरेशन मेघदूत

प्रश्न : कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली 10 एप्रिल 2020 रोजी जी-20 ऊर्जा मंत्र्यांची आभासी बैठक पार पडली?
उत्तर : सौदी अरब

प्रश्न : कोणत्या दिवशी पहिला ‘जागतिक चगास रोग दिन’ साजरा करण्यात आला?
उत्तर : 14 एप्रिल 2020

प्रश्न : कोणत्या राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांसाठी भारतातली प्रथम विलगीकरण सुविधा प्रस्थापित करण्यात आली आहे?
उत्तर : जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान

प्रश्न : कोणती उड्डाणादरम्यान प्रवाश्यांची कोरोना तपासणी करणारी पहिली हवाई सेवा आहे?
उत्तर : एमिरेट्स

प्रश्न : कोणत्या कायद्याच्या अन्वये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा एक गुन्हा ठरविण्यात आला आहे?
उत्तर : आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५

प्रश्न : कोणत्या कलाकाराच्या जयंतीनिमित्त ‘जागतिक कला दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : लिओनार्डो दा विंची

प्रश्न : कोणत्या बँकेनी सामाजिक अंतर पाळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेफ्टी ग्रिड’ मोहीम चालवली आहे?
उत्तर : HDFC बँक

प्रश्न : 2020 साली जागतिक हिमोफिलिया दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : गेट+इनवॉल्व्ड

प्रश्न : कोणत्या राज्य सरकारने ‘सिघाट’ (Cghaat) संकेतस्थळाचे अनावरण केले?
उत्तर : छत्तीसगड

प्रश्न : कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने ‘अॅसेस करो ना’ मोबाइल अॅप सादर केले?
उत्तर : दिल्ली

 

स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने भूगोल विषयातील काही महत्वाच्या सागरी संज्ञा

  • सागर : जमिनीने पूर्णः किंवा अंशतः वेढलेल्या खा-या पाण्याचा जलभाग म्हणजे सागर किंवा समुद्र होय.
  • महासागर : दोन खंडांदरम्यान पसरलेला खा-या पाण्याचा विस्तीर्ण साठा म्हणजे महासागर होय.
  • उपसागर : सर्वसाधारणपणे जमिनीने तीन बाजूंनी वेढला गेलेला सागराचा लहान भाग म्हणजे उपसागर होय.
  • आखात : जमिनीत घुसलेला सागराचा अरुंद भाग, म्हणजे आखात होय.
  • सरोवर : भूपृष्ठावरील सखल भागात नैसर्गिकरीत्या तयार झालेला जलाशय म्हणजे सरोवर होय.
  • जलावरण : पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेला भाग, म्हणजे जलावरण होय.
  • खाडी : समुद्राचे पाणी नदीच्या मुखातून जेथेपर्यंत नदीत शिरते, त्या नदीच्या भागाला खाडी म्हणतात.
  • सागरी मैदान : सागरतळाचा सपाट व सखल भाग म्हणजे सागरी मैदान होय.
  • गर्ता : सागरातील अरुंद व अतिखोल भागास गर्ता म्हणतात.
  • सागरी डोह : सागरतळावर काही ठिकाणी खोल,अरुंद आणि तीव्र उतारांची सागरी भूरूपे आढळतात. त्यातील कमी खोलीच्या अरुंद व तीव्र उतारांची सागरी भूरूपे म्हणजे सागरी डोह होय.
ऑनलाइन पैसे कमविण्याचा मार्ग