अनुक्रमणिका
show
ठिबक सिंचन करण्याचे फायदे
मान्सूनची अनियमितता व पावसाच्या घटत्या प्रमाणामुळे शेतीसाठी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता जाणवत असते, अशा परिस्थितीत ठिबक सिंचनचा अवलंब अत्यंत महत्वाचा आहे.
ठिबक सिंचनाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत :
- ठिबकने द्रवरूप खत देता येऊन शंभर टक्के खताचा वापर होतो.
- खताच्या खर्चामध्ये 30-35 % बचत होते.
- पिकांना समप्रमाणात खते देता येतात.
- पिके लवकर काढणीला येऊन दुबार पिकाला फायद्याचे ठरते
- पाण्याची 30 ते 80% बचत होते.
- वाचलेल्या पाण्याचा दुसऱ्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी वापर करता येतो.
- क्षारयुक्त जमिनीत ठिबकने पाणी दिल्यास पिकांचे उत्पादन घेता येते.
- पाणी देण्यासाठी रानबांधनीची गरज नसल्याने मजुरी खर्चात बचत होते.
- उत्पादनात 20 ते 200 टक्क्यांपर्यंत वाढ होते.
- कमी किंवा जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही.
- ठिबकने एकसारख्या प्रमाणात पाणी दिले गेल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने व जलद होते.
- चढ उतार असणाऱ्या जमिनी ह्या सपाट ठेवता त्या ठिबकने लागवडीखाली आणता येतात.
- कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पीके घेऊन उत्पादन घेता येते.
- ठिबक सिंचनाचा वापर केल्याने जमिनीची धूप थांबते.
- पाणी साठून राहत नाही.