तेलंगानामध्ये सरकार ने वाढवले लॉकडाउन

तेलंगानामध्ये सरकार ने वाढवले लॉकडाउन

तेलंगानामध्ये सरकार ने वाढवले लॉकडाउन

देशात कोरोनाचा धाक वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने 3 मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केले आहे. मात्र या निर्णयानंतर आता तेलंगण सरकारने लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे.

लॉकडाउन वाढवला : तेलंग राज्यात 7 मे पर्यंत लॉकडाउन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

तेलंगणमध्ये विदेशातून आलेल्या 64 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीतील निजामुद्दीन स्थित मरकजमध्ये सहभागी लोकांच्या प्रवासाचा इतिहासही आम्ही शोधत आहोत, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली.

कठोर पालन : दरम्यान, ७ मे पर्यंत राज्यात वाढवलेल्या लॉकडाउनचे कठोरपणे पालन केले जाईल याची काळजी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याबरोबरच सरकारने झोमॅटो, स्विगी आणि पिझ्झा घरपोच पोहोचवण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर 5 मे रोजी परिस्थितीनुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले.

ऑनलाइन पैसे कमविण्याचा मार्ग