दुधासोबत सुंठाचे सेवन केल्याने होणारे चमत्कारिक फायदे

दुधासोबत सुंठाचे सेवन केल्याने होणारे चमत्कारिक फायदे

दुधासोबत सुंठाचे सेवन केल्याने होणारे चमत्कारिक फायदे

नुसत्या दुधाचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक यात असतात. पण तुम्हाला माहित आहे का सुंठाच्या दुधाचे सेवन करून तुम्ही अनेक समस्यांपासून लांब राहू शकता.

  1. सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त : सुकलेल्या आल्यात आणि सुंठात एंटी बॅक्टीरियल गुण असतात. सर्दी- खोकला आणि ताप अशा अनेक लहान मोठ्या समस्यांपासून आराम मिळवता येतो.
  2. असे करा सेवन : आधी दुध गरम करा. त्यामध्ये 1 चमचा सुंठाची पावडर घाला. मग दूध उकळून घ्या. नंतर ते गाळून घ्या. सुंठाच्या दुधाचे सेवन रात्री करणे चांगले आहे.
  3. शारीरिकदृष्ट्या फिट : सुंठाच्या दुधाचा आहारात समावेश करून तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. जर तुम्ही दररोज व्यायाम करत असाल तर सुंठाच्या दुधाने उर्जा मिळवू शकता.
  4. घशाची खवखव बंद : ऋतु बदलल्यानंतर गळा खवखवणे ही समस्या खूपचं कॉमन दिसून येते. जर तुम्हाला सुद्धा असा त्रास होत असेल तर सुंठाच्या दुधाच्या सेवनाने फरक दिसून येईल.
  5. थकव्याला पूर्णविराम : वातावरणामुळे बदलत्या वातावरणात जीवनशैलीतील बदलांमुळे ताप येणे, थकवा जाणवणे, अंगदुखीची समस्या सतत उद्भवत असते. जर तुम्ही रोज रात्री झोपण्याआधी सुंठाच्या दुधाचे सेवन केलं तर फरक दिसून येईल.

कोमट पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याचे फायदे

खाज सुटणे : कोमट मिठाचे पाणी त्वचेवरील विषारी आणि हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी उपयोगी असून आंघोळ केल्याने खाज सुटण्याची समस्या संपते.

झोप : रात्री चांगली झोप देखील लागते, तसेच निद्रानाश ग्रस्तानी आवर्जुन हा उपाय करुण बघा.

त्वचेवर ग्लो : हाडे आणि नखे मजबूत बनतात, तसेच त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे आपोआपच त्वचेवर ग्लो येण्यास सुरवात होते.

केसातील कोंडा : तुम्हाला अधिक शांत, आनंदी आणि निश्चिंत वाटेल तसेच केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत मिळेल.

सांधेदुखी : शरीराला आराम मिळतो, वेदना कमी होते आणि थकवा व तणावही दूर होतो तसेच सांधेदुखीपासून आराम मिळतो.