पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार आहेत देशासोबत मन की बात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार आहेत देशासोबत मन की बात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.26) सकाळी 11 वाजता ‘मन की बात’मधून जनतेशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी त्यांचा हा ‘मन की बात’चा कार्यक्रम होतो.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊनमध्ये 3 मेपर्यंत वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

आवाहन:

पंतप्रधान मोदींनी 12 एप्रिलला ट्विट करून उद्या होणाऱ्या ‘मन की बात’साठी काही सूचना मागवल्या होत्या. 1800-11-7800 फोन नंबरवर आपला संदेश रेकॉर्ड करावा किंवा MyGov आणि NaMo अ‍ॅपवर संदेश लिहून पाठवण्याचे आवाहन मोदींनी केले होते. या वर्षातील मोदींचा हा चौथा ‘मन की बात’चा कार्यक्रम आहे.

उद्या संवाद:

देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी उद्या (दि.27) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. या चर्चेत लॉकडाऊनबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेतून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदी आजच्या कार्यक्रमातून काय संकेत देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महाराष्ट्रात 3 मेनंतर आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय नाही; राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रात्री केले स्पष्ट

राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे तब्बल 811 नवीन रुग्ण सापडले, 22 जणांचा मृत्यू; आजवरचा 24 तासांतील रुग्णांचा उच्चांक

इराणहून परतलेल्या कोल्हापूर शहरातील नागाळा पार्कातील 38 वर्षीय तरुणाला कोरोना; 19 दिवसांनंतर तरुणाच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह

राष्ट्रपती कोविंद यांचे सचिव संजय कोठारी यांनी शनिवारी घेतली केंद्रीय माहिती आयुक्तपदाची (सीव्हीसी) शपथ; शपथग्रहण समारंभात सोशल डिस्टन्सिंगचे पालन

केंद्र आणि राज्यांमध्ये तूर्तास रॅपिड अँटीबॉडी टेस्टला स्थगिती; आयसीएमआरकडून रॅपिड अँटीबॉडी टेस्टची अचुकता तपासली जात आहे

शिमला : रोहतांग पास आजपासून (दि.26) वाहतुकीसाठी खुला; सायंकाळपर्यंत पूर्णपणे बर्फ हटवला जाणार, हिमवृष्टीमुळे लाहौल खोऱ्याला जगाशी जोडणारा पास 6 महिन्यांपासून होता बंद

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाचं औचित्य साधत ‘गॉड ऑफ क्रिकेट’ या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित; पोस्टरला निर्माता महेश भट्टचा आवाज

कोरोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकेत औषधे व लसी मिळून एकूण 72 घटकांवर चाचण्या सुरू; 211 घटक हे कोविड 19 उपचारातील नियोजन पातळीवर; ट्रम्प प्रशासन

भारताचा क्रिकेटपटू सचिनचा 100 शतकांचा विक्रम विराट कोहली मोडू शकेल; ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली

 

ऑनलाइन पैसे कमविण्याचा मार्ग