अनुक्रमणिका
show
बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतो
- बटाटे खराब होऊ नयेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवले जातात. मात्र, ही कृती आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते.
- बटाट्यातल्या स्टार्चचे रुपांतर साखरेत होते. हीच साखर आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरते.
- फ्रीजमधील बटाटे खाल्ल्यामुळे कर्करोगासारखी दुर्धर व्याधीही जडू शकते.
- बटाट्यातल्या साखरेचा यातल्याच अमिनो अॅसिड अॅस्परॅगनशी संपर्क होऊन अॅक्राइलामाइड नावाचे घातक रसायन तयार होते. हे रसायन आरोग्यासाठी घातक ठरते.
- फ्रीजमध्ये ठेवलेले बटाटे शिजवल्यानंतर त्यात अॅक्राइलामाइड रसायनाची निर्मिती होऊ लागते. हे रसायन पोटात गेल्यानंतर बराच त्रास होऊ शकतो. त्यामुळे बटाटे कोरड्या जागी ठेवायला हवेत.
अॅक्राइलामाइड हे रसायन स्टार्चयुक्त पदार्थांमध्ये आढळते. उच्च तापमानावर शिजवलेल्या स्टार्चयुक्त पदार्थांमध्ये या रसायनाची निर्मिती होते. हे रसायन कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते.