उन्हाळ्यात बाजरी चे पिक कसे घ्यावे

उन्हाळ्यात बाजरी चे पिक कसे घ्यावे

उन्हाळ्यात बाजरी चे पिक कसे घ्यावे

महाराष्ट्रामध्ये खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागात उन्हाळी बाजरीचे पीक घेतले जाते. उन्हाळी हंगामातील ढगविरहित स्वच्छ हवामान व भरपूर सूर्यप्रकाश या पीकाला मानवते.

जमिनीची निवड व मशागत कशी करावी:

उन्हाळ्यात बाजरीच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा  व सपाट मध्यम ते भारी खोलीची, असणारी जमीन निवडावी. साधारणता जमिनीचा सामू हा 6.2 ते 8 असायला हवा. दुसऱ्या कुळवणीपूर्वी एकरी अडीज ते 3 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरावे. जमिनीची पूर्वमशागत करताना पंधरा सें.मी. खोलीपर्यंत एक नांगरट व कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

पेरणी :

उन्हाळ्यात बाजरीची पेरणी हि थंडी कमी झाल्यावर सुमारे जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्या पासून ते फेब्रुवारी महिन्याचा पहिल्या पंधरवड्यात करणे फायदेशीर ठरते.

खत व्यवस्थापन :

पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी एकरी 18 किलो नत्र द्यावे व पेरणीवेळी प्रति एकरी प्रमाणे नत्र,स्फुरद आणि पालाश प्रति 18 किलो द्यावेत.

पाणी व्यवस्थापन :

पेरणी झाल्यानंतर पिकांना 4 ते 5 दिवसांनी हलके पहिले पाणी द्यावे व त्यानंतर 11 ते 13 दिवसांच्या अंतराने सहा ते सात पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

काढणी :

उन्हाळ्यात बाजरीची संतुलित खत व पाणी व्यवस्थापन, संकरीत किंवा सुधारित वाणांचा वापर  केल्यास प्रति एकरी 14 ते 16 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकते