ब्लॉग म्हणजे काय | ब्लॉग कसा तयार करावा

ब्लॉग म्हणजे काय

1.   ब्लॉग म्हणजे काय?

आज या इंटरनेट च्या जगात ब्लॉग म्हणजे काय हा प्रश्न सुरुवातीला सर्वांनाच पडला असेल या लेखामध्ये मी तुम्हाला ब्लॉग कसा तयार करावाब्लॉग कसा लिहावा या विषयी अगदी सविस्तर माहिती सांगणार आहे

Blogger चा उपयोग करून तुम्ही तुमचा स्वतःचा एक blog तयार करू शकता. त्या आधी तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमका हा ब्लॉग म्हणजे आहे तरी काय. ब्लॉग म्हणजे तुमच्या मध्ये जर काही कला असतील, काही गुण आणि त्याबद्दल तुम्हाला भरपूर माहिती आहे आणि ते तुम्हाला लिहिता सुद्धा येते तर तुम्ही एक लेखक आहात आणि आता हि माहिती तुम्ही कुठे तरी कागदावर लिहून किंवा तुमची स्वतःची notes बनवून ठेवू शकता अर्थातच एक पुस्तक सुद्धा बनवू शकता.

तर आता हि माहिती तुम्हाला लोकांपर्यंत पोहचवायची असल्यास तुम्हाला स्वतःचे पुस्तक छापण्याचा खर्च करून पब्लिकेशन करून विकावे लागेल आणि सोबत मार्केटिंग सुद्धा करावी लागेल पण यामध्ये तुम्हाला खूप खर्च सुद्धा लागू शकतो आणि जर तुम्हाला त्या पुस्तकामध्ये काही बदल करावयाचे असले किंवा आणखी काही लेख लिहायचे असले तर खूप मोठी अडचणच होय कारण पुन्हा प्रिंटींग खर्च होयचं कि, त्यासाठीच तुम्हाला अत्यंत सोयीचे असे blogger आहे, यामध्ये तुम्हाला पुस्तक लिहायची गरज नाही तुम्ही यामध्ये तुमचे लेख हे post च्या स्वरुपात लिहू शकता आणि अश्या post तुम्ही केव्हा पण लिहून बदल करू शकता, पुसू शकता आणि ते सुद्धा अगदी सोप्या पद्धीतीने आणि अगदी मोफत जगामध्ये कोठेही तुमच्या blog च्या post पोहचू शकता.

2. ब्लॉग कसा लिहावा

ब्लॉग हा कोणताही व्यक्ती लिहू शकतो ब्लॉग हा वेबलॉगचा आणखी एक शब्द आहे. वेबलॉग ही एक वेबसाइट आहे जी डायरी किंवा जर्नल सारखी असते. बरेच लोक ब्लॉग तयार करू शकतात आणि त्या ब्लॉगवर लिहू शकतात. ब्लॉगर लोक बहुतेक वेळा त्यांच्या मते आणि विचारांबद्दल लिहित असतात. व्हिडीओ मटेरियल असलेल्या ब्लॉगला व्हिडीओ ब्लॉग किंवा व्हीलॉग म्हणतात, सहसा व्हीलॉग खूप छोटा केला जातो.

जेव्हा एखादी व्यक्ती ब्लॉगवर लिहिते तेव्हा ते जे लिहित असतात ते पोस्टच्या स्वरूपात असते, जे ब्लॉगवर लिहिण्याचा एकच तुकडा असतो. पोस्टमध्ये बर्‍याचदा इतर वेबसाइटचे दुवे समाविष्ट असतात.

ब्लॉगमध्ये एक किंवा अधिक लेखक असू शकतात. जर त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त लेखक असतील तर त्यांना बर्‍याचदा समुदाय ब्लॉग, कार्यसंघ ब्लॉग किंवा गट ब्लॉग असे म्हटले जाते कारण विचार एकापेक्षा जास्त व्यक्तींनी केले आहेत.

3. ब्लॉगर (Blogger) म्हणजे काय?

ब्लॉगर (Blogger) हि एक गुगल ची सेवा आहे आणि google प्रमाणेच blogger सुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि blogger सुद्धा google ची मोफत सेवा मधूनच हि एक सेवा आहे, google ने हे खास त्या लोकांसाठी बनविले आहेत जे एक writer लेखक आहेत, जे लोक आपले लेख इंटरनेट च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी उत्सुक आहेत खास त्यांचासाठी या blogger चा खूप उपयोग होतो. blogger चा उपयोग करून तुम्ही तुमचे लेख जगभरात इंटरनेट च्या माध्यामतून पोहचवू शकता आणि त्यासोबतच कमाई सुद्धा करू शकता आणि ती कशी तर या लेखामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे कि blogger चा उपयोग करून तुम्ही कमाई कशा पद्धतीने करू शकता.

तुम्ही इंटरनेटवर कमाई करण्यासाठी blogger हा अत्यंत लोकप्रिय आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला फक्त एक google चे Gmail Account हवे आहे. तुम्हला Google ची कोणतीही सेवा जर वापरायची असेल तर तुम्हाला Gmail Account असणे अत्यंत आवश्यक आहे. Gmail Account बद्दल मी माझ्या Google Gmail या लेखामध्ये याविषयी सविस्तर लिहलेले आहे तो तुम्ही नीट वाचून घेणे. तर मग चला बघूया google चे blogger कश्या पद्धतीने काम करते.

 

4.   ब्लॉग कसा तयार करावा?

  • सुरुवातीला गूगल च्या अधिकृत ब्लॉगर वेबसाइट ला भेट दया https://www.blogger.com/
  • स्वतःचा एक blog तयार करण्याकरिता तुम्हाला तुमचे Gmail Account असणे आवश्यक आहे या नंतर जीमेल आयडी टाकून login करा.
  • Gmail ला login केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला ब्लॉगर चा मेनू दिसेल तिथे New blog या मेनू वर क्लिक करा.

ब्लॉग म्हणजे काय

  • New Blog या बटन वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर वरील आकृतीप्रमाणे बॉक्स दिसेल
  • Title मध्ये तुमच्या ब्लॉग चे नाव लिहा. आणि Address मध्ये तुम्हाला हवे असलेले नाव उदा. तुमचा ब्लॉग हा Recipe वर असेल तर Address येईल recipe.com हा झाला तुमचा blog Address म्हणजे जर कोणाला तुमच्या ब्लॉग पर्यंत पोहचायचे असेल तर ते browser मध्ये डायरेक्ट हा Address टाकून तुमच्या ब्लॉग पर्यंत पोहचू शकतात आणि वाचू शकतात. त्यानंतर तुम्हाला हवी असेल ती Theme म्हणजे design तुम्ही निवडू शकता त्यानंतर Create या बटन वर क्लिक करा आणि तुमचा ब्लॉग तयार करा.

ब्लॉग कसा तयार करावा

  • तुमचा ब्लॉग आता तयार आहे पण तो आता पूर्णपणे रिकामा आहे म्हणजे त्यावर तुम्हाला तुमचे आर्टिकल किंवा पोस्ट लिहायच्या आहेत त्यासाठी तुम्ही new post बटन वर क्लिक करावे.

 

  • Post title मध्ये तुमच्या लेखाचे टायटल लिहावे. आणि खाली पेजवर तुमच्या लेखाचा मजकूर लिहावा.

ब्लॉग कसा लिहावा

  • मजकूर लिहिण्यासाठी मजकुरामध्ये फोटो टाकण्यासाठी तुम्ही दिलेल्या टूलबार चा उपयोग करू शकता मजकूर पूर्ण लिहिल्यावर/झाल्यावर तुम्ही पब्लिश बटन वर क्लिक करा यामुळे तुमचा लेख हा इंटरनेट वर जगभरात दिसण्यासाठी लाइव्ह होऊन जाईल.
  • अश्या प्रकारे तुम्ही तुमचे जेवढे लेख असतील तेवढे तुम्ही लिहू शकता यामध्ये कोणतीही मर्यादा नाही.
  • खाली दिलेल्या आकृती प्रमाणे तुम्ही Posts All मध्ये तुम्ही लिहिलेल्या सर्व post लेख पाहू शकता

ब्लॉग लेखन

ब्लॉगर मेनू मध्ये असलेल्या मेनू विषयी थोडक्यात माहिती

  • Stats: मध्ये तुमच्या ब्लॉग ला किती लोक पाहतात किंवा तुमच्या ब्लॉग/लेख ला किती लोक विजीट करतात याचा संपूर्ण आढावा तुम्ही stats मध्ये बघू शकता stats म्हणजे statistics.

 

  • Comments: मध्ये तुमचा लेख वाचल्यानंतर विजीटर किंवा तुमच्या लेखाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर ती प्रतिक्रिया comments मध्ये लिहितात आणि त्या प्रतिक्रिया तुम्ही इथे बघू शकता

 

  • Earnings: मध्ये तुम्ही ब्लॉग च्या माध्यमातून केलेली कमाई बघू शकता पण त्यासाठी तुम्हाला Google Adsense चे approved अकाऊंट लागेल या विषयी तुम्हाला या पुस्तकाच्या शेवटच्या लेखामध्ये Google Adsense विषयी संपूर्ण माहिती दिली जाईल.

 

  • Pages: मध्ये तुम्ही तुमच्या ब्लॉग चे पेज लिहू शकता उदा. Home, About Us, Contact Us आदी पेज तयार करू शकता आणि प्रेक्षकांना दर्शवू शकता.

 

  • Layout: मध्ये तुम्ही तुमच्या ब्लॉग चे design डिजाइन बदलवू शकता, त्यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळे महत्वाचे पर्याय उपलब्ध आहे यामध्ये तुम्ही widget चा उपयोग करून तुमचा ब्लॉग आणखी आकर्षक बनवू शकता.

 

  • Theme: चा उपयोग करून तुम्ही तुमच्या ब्लॉग ला वेगवेगळ्या थीम बदलवू शकता यामध्ये तुम्हाला हवी असेल ती थीम तुम्ही निवडू शकता.

 

  • Setting: मध्ये तुमच्या ब्लॉग विषयी अत्यंत महत्वाच्या सेटिंग्ज आहेत जसे comments, user setting, search preferences, blog author याचा उपयोग करून तुम्ही तुमचे प्रोफाइल बदलवू शकता, तुमचा ब्लॉग हा google search मध्ये दिसायला हवा की नाही, तुमच्या लेखाला कोणी प्रतिक्रिया द्यायला हव्या की नाही अश्या ची सेटिंग तुम्ही इथून करू शकता.

हे सुद्धा वाचा – ऑनलाइन पैसे कमावण्याचे 10 यशस्वी मार्ग