मराठा आरक्षणानुसार होणार पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश

सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा सामाजाच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात या वर्षी मराठा आरक्षण कायम राहणार आहे.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणास स्थगिती देण्यास नकार दिला असून मराठा आरक्षण प्रकरण प्रलंबित असल्याने यावर स्थगिती देता येणार नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची तसेच मराठा आरक्षणानुसार झालेले प्रवेशही रद्द करण्याची याचिकाही कोर्टाने फेटाळली आहे.

पात्र विद्यार्थ्यांना होणार फायदा : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमांना २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मराठा आरक्षणानुसार प्रवेश दिला जाणार आहे. याचा फायदा पात्र असलेल्या मराठा विद्यार्थ्यांना होणार आहे.

३ मेपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही दुकानं सुरु होणार नाहीत. काही दुकानांना, व्यवहारांना केंद्र सरकारने संमती दिली असली तरी राज्य शासन यामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात असलेली दुकानं सुरु करण्याचा प्रश्नच नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

▪️ लॉकडाउन हा कदाचित ३ मेपर्यंत जसा आहेत तसाच सुरु राहिल. ३ मे नंतरच याबाबतीतला निर्णय होईल. २७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आहे. त्यावेळी काही वेगळा निर्णय घेतला गेला तर तो माननीय मुख्यमंत्री सांगतीलच.

▪️ लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा वगळून सगळी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारने काल रात्री उशिरा काही निर्देश जारी करत काही व्यवहारांना सूट दिली. मात्र असा कोणताही राज्य सरकारने घेतलेला नाही.

दरम्यान, टोपे यांनी दिलेल्या या माहितीमुळे २७ एप्रिल रोजी पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्र्यांची काय चर्चा आणि निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी दि. 25-04-2020

▪️ भारतात आतापर्यंत 24506 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण, तर 775 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू; 5063 कोरोनाग्रस्त उपचारानंतर झाले बरे

▪️ सलून, रेस्टॉरंट्स आणि दारूची दुकाने लॉकडाउनच्या काळात बंदच; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांचे स्पष्टीकरण

▪️ उत्तर पश्चिम बंगालमध्ये लॉकडाउनची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता; केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाच्या सूचना

▪️ उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती; चीनमधील डॉक्टरांचे एक पथक उत्तर कोरियाला रवाना

▪️ महाराष्ट्रात आतापर्यंत 6817 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण, तर 301 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू; 840 कोरोनाग्रस्त उपचारानंतर झाले बरे

▪️ कोरोनाग्रस्तांच्या मुंबई आणि पुण्यातील वाढत्या संख्येमुळे दोन्ही शहरातील लॉकडाऊन 18 मे पर्यंत वाढण्याची शक्यता; आरोग्यमंत्र्यांची माहिती

▪️ राजस्थानात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी हालचाली सुरू; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

▪️ फेसबुकने आपल्या मेसेंजर अ‍ॅपमध्ये ‘फेसबुक मेसेंजर रूम्स’ नावाचं आणलं खास फिचर; एकाचवेळी 50 जणांना करता येणार व्हिडिओ कॉल

▪️ ‘कोरोनाशी लढण्यासाठी पैशांची गरज असल्यास पहिले सीमेवर दहशतवाद थांबवा’; माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी पाकिस्तानला सुनावले.

▪️ लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नवी उमेद देणाऱ्या वेबसिरीज 27 एप्रिल पासून ‘झी मराठी’वर होणार प्रसारित