मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना

मराठी चित्रपट योजना

मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना

महाराष्ट्रातील दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभागाकडून अर्थसहाय्य योजना सुरु करण्यात आली.

योजनेच्या लाभासाठी प्रमुख अटी :

  • लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • चित्रपट परिक्षण समितीने परिक्षणानंतर निश्चित केलेला दर्जा अंतिम असेल.
  • कोणत्याही चित्रपटाचे पुन:परिक्षण केले जात नाही.
  • अर्थसहाय्यासाठी सादर झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे किमान 1 लाख रुपये भाडे शुल्काएवढे चित्रीकरण गोरेगांव चित्रनगरी किंवा कोल्हापूर चित्रनगरी येथे करणे अनिवार्य आहे. अन्यथा अर्थसहाय्यातून 1 लाख रुपये कपात केली जाईल.
  • योजनेतील नियमात बदल करणे, सुधारणा करणे किंवा अर्थ लावणे याबाबतचे पूर्ण अधिकार शासनास असतील.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या नमून्यातील अर्ज.
  • चित्रपट कथा, पटकथा, संवादाची प्रत आणि रिळे डिव्हीडीज / डिसीपी (डिजीटल सिनेमा पॅकेज) व सनदी लेखापालाने प्रमाणित केलेले नफा / तोटा व ताळेबंद व इतर संबंधित कागदपत्रे.

असे असेल योजनेच्या लाभाचे स्वरूप :

  • ‘अ’ दर्जा प्राप्त चित्रपटास 40 लाख किंवा चित्रपट निर्मितीचा प्रत्यक्ष खर्च त्यापैकी जी रक्कम कमी असेल, ती रक्कम
  • ‘ब’ दर्जा प्राप्त चित्रपटास 30 लाख किंवा चित्रपट निर्मितीचा खर्च यापैकी जी रक्कम कमी असेल, ती रक्कम

संपर्क कुठे करावा ? :

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ,

दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव (पश्चिम), मुंबई – 65.