कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. त्यामुळे लोकं घरातच आहेत. अशा परिस्थितीत घरातील प्रत्येक कामासोबत स्वयंपाक करणे हे बर्याच लोकांसाठी एक मोठे काम बनते.
जर आपणही याच विवंचनेत असाल की, आज आपल्याला काय बनवायचे, तर आपण मसाले भात कसा बनवायचा पाहू शकता. म्हणूनच मसाला भात बनवण्याची कृती जाणून घेऊयात.
साहित्य :
2 गाजर चिरलेले, हिरवा वाटाणे, 6 बेबी कॉर्न कापलेले, 2 बटाटे चिरलेले, 2 कप शिजवून थंड झालेले तांदूळ, सोयाबीन चिरलेले, 1 कांदा चिरलेला, 1 चमचा जिरेपूड,1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ.
कृती :
प्रथम कढईत तेल टाकून गरम करा. गरम झाल्यावर त्यात जिरे आणि नंतर कांदे घाला.
नंतर थोडा मऊ होईस्तोवर तळा. आता चिरलेली भाजी घाला आणि 2 मिनिटे तळा.
मीठ, तिखट, गरम मसाला आणि जिरेपूड घाला, चांगले मिक्स करा.
नंतर 10 ते 12 मिनिटे तसेच झाकून ठेवा. आता या व्हेज मसाल्यात तांदूळ घाला.
आणि मिक्स करा. तुमचा मसाला भात तयार होई
हे सुद्धा वाचा – आठवड्यातून एकदा उपवास केल्याने होणारे 5 आरोग्यदायी फायदे
हे सुद्धा वाचा – दुधासोबत सुंठाचे सेवन केल्याने होणारे चमत्कारिक फायदे