महाराष्ट्र राज्यात 75 हजार रॅपिड टेस्ट करण्यास केंद्र सरकार ची मान्यता
महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहेत. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे.
- त्यानुसार राज्यात 75 हजार चाचण्या केल्या जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
- मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्याच बरोबर राज्याच्या कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
- आरोग्यमंत्र्यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
81 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत; टोपे
महाराष्ट्रात आतापर्यंत 12 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तर 81 टक्के कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या 17 टक्के आणि आयसीयूमध्ये असणाऱ्यांची संख्या 2 टक्के आहे.
त्यामुळे घाबरुन जाऊ नका. काही लक्षणे आढळल्यास स्वत:हून टेस्टसाठी पुढे या, असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं.
राजेश टोपे म्हणाले :
“राज्यात आजचा कोरोनाबाधितांचा आकडा 4,666 वर पोहोचला आहे. काल पुन्हा 350 ते 400 दरम्यान वाढ झाली आहे.
परंतु डिस्चार्ज झालेल्यांची संख्यादेखील 572 आहे. आतापर्यंत 232 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे तिन्ही आकडे सांगणे गरजेचं आहे.
“राज्य सरकार सर्व गोष्टी नियमानुसार, काटेकोरपणे आणि गाभिर्याने करत आहे. हे मला अत्यंत जबाबदारीनं सांगणं गरजेचं आहे.
आता पर्यंत देशामध्येही कुठेहि जेवढ्या टेस्ट झाल्या नसतील तेवढ्या टेस्ट महाराष्ट्रामध्ये झाल्या आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 76 हजार टेस्ट झाल्या आहेत.
यापैकी मुंबईत 50 हजारपेक्षाही जास्त टेस्ट झाल्या आहेत. यापैकी फक्त 2 टक्के लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे”.
“आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग फार मोठ्या प्रमाणात करतोय. महाराष्ट्रात जवळपास 368 कंटेन्मेंट झोन आहेत. महाराष्ट्रात 6,359 एवढ्या जणांची सर्व्हिलन्सची टीम आहे.
ही टीम राज्यभरातील घराघरात जाऊन कुणाला ताप, खोकला, सर्दी, घसा खवखवतो आहे का? किंवा काही लक्षणे दिसत आहेत का? याचे अवलोकन करत आहे.
राज्यात जवळपास 87,254 लोकांना होम क्वारंटाईन केलं आहे. तर 6743 लोक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये आहेत”.