राष्ट्रपती भवन परिसरात कोरोना रुग्ण आढळला

राष्ट्रपती भवन परिसरात कोरोना रुग्ण आढळला

राष्ट्रपती भवन परिसरात कोरोना रुग्ण आढळला

  1. राष्ट्रपती भवन परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रपती भवन परिसरात राहणाऱ्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
  2. हा रुग्ण राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा नातेवाईक आहे. कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर राष्ट्रपती भवन परिसरात राहणाऱ्या 25 कुटुंबियांना अलगीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
  3. देशात कोरोनाचा प्रसारामुळे चिंताजनक स्थिती आहे. राजधानी दिल्लीत जवळपास 76 हॉटस्पॉट निश्चित केले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने महत्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानबाबत विशेष खबरदारी घेतली आहे.
  4. राष्ट्रपती भवन परिसरात एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. राष्ट्रपती भवनात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची परिसरातच निवासस्थाने आहेत. हा रुग्ण राष्ट्रपती भवनात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा नातेवाईक असल्याची माहिती मिळाली दिली.

 

सरकारनं या निर्णयावर पुनर्विचार करावा – सुप्रिया सुळे

  1. ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामातील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायजर तयार करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
  2. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी रुग्णालयांची संख्या वाढवली जात आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरकारकडून वैयक्तिक स्वच्छतेवरही भर दिला जात आहे.
  3. त्यासाठी सर्वांनाच हात स्वच्छ ठेवण्याचे, त्यासाठी सॅनिटायजरचा वापर करण्याचे आवाहन करत आहेत. हे सॅनिटायजर सर्वांना उपलब्ध होण्यासाठी त्याचे उत्पादन वाढवण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारने तांदळापासून सॅनिटायजर बनविण्याचा निर्णय घेतला आहे.
  4. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘सॅनिटायजर आवश्यक आहेच, त्याचे उत्पादन करायलाच हवे. मात्र, लॉकडाऊनच्या परिस्थितीत देशातील गोरगरीब जनता अन्नासाठी संघर्ष करीत आहे. अशा वेळी आपले सर्वांचे प्राधान्य गरिबांचे पोट भरण्यास असायला हवे.
  5. बफर स्टॉकमधील तांदूळ स्थलांतरीत मजुरांना देता येऊ शकतो. त्यामुळे सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा आणि गोदामांतील तांदूळ गरिबांना वाटण्यासाठी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.