लॉकडाऊनच्या काळात हे एप ठरले सर्वाधिक लोकप्रिय

लॉकडाऊनच्या काळात हे एप ठरले सर्वाधिक लोकप्रिय आणि महत्वाचे

लॉकडाऊनच्या काळात ‘हे’ एप ठरले सर्वाधिक लोकप्रिय आणि महत्वाचे

लॉक डाउनच्या काळात लोक सोशल मीडियावर खूप सक्रिय झाले आहेत. या काळात जवळजवळ सर्वजणच घरी असल्याने एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत.

  • Top एप : यात झूम (Zoom) नावाचे App इतके लोकप्रिय झाले आहे की, या काळात ते भारतातील सर्वात जास्त डाउनलोड केलेले App ठरले आहे.
  • व्हिडीओ कॉलिंग एप : या बाबतीत झूमने लोकप्रिय अशा व्हॉट्सएप, टिकटॉक आणि इंस्टाग्रामलाही मागे टाकले आहे. सध्या लोकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसल्याने लोक झूम नावाच्या व्हिडिओ कॉलींग App द्वारे एकमेकांच्या संपर्कात राहत आहेत.
  • विशेष: सिलिकॉन व्हॅली येथील स्टार्टअप कंपनीने बनविलेले हे एप व्हिडीओ कॉन्फरन्सिंग एप आहे, ज्यात एकावेळी 50 लोक जोडले जाऊ शकतात.
  • एवढे डाउनलोड : हे एप अवघ्या काही दिवसांत लोकप्रिय झाले. आतापर्यंत 500 दशलक्ष लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे.
  • झूम हे असे एकमेव एप आहे ज्यात व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान 10 पेक्षा जास्त लोकांना एकाच वेळी जोडले जाऊ शकते.

भारत सरकारने लाँच केले ‘आरोग्य सेतू’ App

भारत सरकारने कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी ‘आरोग्य सेतू’ हे मोबाईल अ‌ॅप लाँच केले आहे.

विशेष : सरकार या एपच्या माध्यमातून कोरोना बाधित रूग्णांचे लोकेशन शोधू शकणार आहे. याशिवाय युजर्स हे कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात आहेत की नाही याची माहितीदेखील समजू शकणार आहे.

हे एप लाँच करण्याआधी सरकारने कोरोना कवच या नावाचे देखील अॅप लाँच केले होते.

आरोग्य सेतू असे करेल काम :
हे एप युजर्सच्या स्मार्टफोनचे लोकेशन ट्रॅक करेल. सोबतच कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात युजर्स आहे की नाही हे ब्लूटूथच्या माध्यमातून शोधण्यास या अॅपची मदत होऊ शकते.

तसेच युजर्स आणि कोरोनाबाधित रूग्ण यांच्यात किती अंतर आहे समजण्यास मदत होणार असून कोरोनापासून कसे संरक्षण करावे याच्या टिप्स देखील यामध्ये वाचता येणार आहे.