वाटाणा लागवड कशी करावी

वाटाणा लागवड कशी करावी

वाटाणा लागवड कशी करावी

वाटाणा लागवड हे रब्बी हंगामात पश्चीम व उत्तर महाराष्ट्रात वाटाणा हे पिक चांगलेच महत्वाचे आहे. चांगला भाव व वर्षभर मागणी असणारा असे या पिकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. हे पिक जरी कडधान्य वर्गातील  असेल तरी सुद्धा या पिकाला हॉटेलमध्ये चांगल्याप्रकारे मागणी आहे. वाटणा लागवड पीक जमिनीच्या आतमध्ये  नत्र स्थिरीकरणाचे काम करत असते, यामुळे होते हे कि जमिनीचे सुद्धा आरोग्य सुधारण्यास मदत होते. वाटणा या पिकांची सातारा, नाशिक, बडोदे, नगर, खानदेश, पुणे या सारख्या ठिकाणी लागवड अधिक केली जाते.

जमिन आणि हवामान कसे असावे :

थंडी असेल तर वाटणा लागवड या पिकाला पिकाला जास्त फायदा होतो. पीक वाढीसाठी अंदाजे दर महिन्याचे सरासरी तापमान 10 ते 20 अंश से. असावे. वाटाण्याच्या बिया उगवण्याकरिता  22 अंश से. तापमान हे अनुकूल तापमान आहे. वाटाणाच्या पिकाच्या लागवडीकरिता सच्छिद्र,सुपीक, मध्यम  पाण्याचा उत्तम निचरा होणारी व खोल अशी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6 ते 7.5 इतका असावा.

खत व्यवस्थापन कसे करावे:

वाटणा पिकाची लगड ओलिताखाली करतांना त्यावेळी हेक्टरी 50:75:50 ही खत मात्रा असायला हवी व तसेच 25 किलो नत्र एक महीन्याने द्यावे लागणार. हेक्‍टरी 8 ते 10 गाड्या चांगल्या प्रकारे कुजलेले शेणखत हे लागवडीपुर्वी आणि  लागवडीनंतर द्यावे. वाटणा पीक जमिनीत नत्र स्थिरीकरण करत असल्या कारणाने नत्रयुक्त खतांची मात्रा कमीच द्यावी लागणार.

पाणी व्यवस्थापन कसे करावे:

वाटणा पिकाला इतर भाजीपाल्यांप्रमाणे पाणी लागत नाही वाटणा या पिकाला कमी पाणी लागते. वाटणा लागवड नंतर या पिकाला हलके पाणी द्यावे लागते. पाण्याची दुसरी पाली हि फुल्धार्नेच्या काळात आणी तिसरी शेंगामध्ये दाने भारत असताना द्यावी लागते. जमीन वाळूमिश्रित आणि हलकी असल्यास याला नियीमित पाणी द्यावे लागेल.

काढणी केव्हा करावी:

वाटाणा हे पिक कमीत कमी 45 आणि जास्तीत जास्त 65 दिवसात काढणी करिता तयार होऊन जाते. या शेंगाचा गडद आणि हिरवा रंग बदलून त्याला  फिक्कट व हिरव्या रंगाच्या आणि टपोऱ्या दिसू लागतात. काढणी 3 ते 4 तोड्यात पूर्ण होऊन जाते.

उत्पादन किती होऊ शकते :

वाटणा हे पिक लवकर येणाऱ्या जातीचे असून हिरव्या शेंगाचे एकरी उत्पादन हे सरासरी 10 ते 15 क्विंटल आणि मध्यम कालावधी मध्ये तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन अंदाजे 20 ते 25 क्विंटलपर्यंत आणि उशिरा येणाऱ्या जातीचे साधारणता 30 ते 40 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळू शकते.