शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना

शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना

शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना

औद्योगिक प्रशिक्षणाद्वारे कारखान्यांना लागणारे कुशल कारागीर तयार करून त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्य निर्मिती करण्यात येते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची योजना सरकारने 1950 साली सुरु करून 1956 साली राज्य शासनास अंमलबजावणीसाठी हस्तांतरीत करण्यात आली

योजनेसाठी प्रमुख अटी :

• उमेदवार भारताचा नागरीक असावा.
• उमेदवाराचे वयाची 14 वर्ष पूर्ण केलेली असावी.
• कोणत्याही व्यवसायाच्या प्रवेशाकरीता कमाल वयोमर्यादेची अट नाही.
• उमेदवार महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असावा.
• उमेदवाराचे आई किंवा वडील महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.

आवश्यक कागदपत्रे :

शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश पद्धती व नियमावली (माहिती पुस्तिका www.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)

लाभाचे स्वरूप असे :

शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत इ. 10 वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 1 वर्ष, 2 वर्ष मुदतीचे अभ्यासक्रम राबविले जातात, सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये NCVT ने निर्देशित केलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमाप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते.

या ठिकाणी संपर्क साधावा :

• व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, 3, महापालिका मार्ग, टपाल पेटी क्रमांक 10036, मुंबई 400 001.
• सर्व विभागीय सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक व औरंग़ाबाद
• सर्व प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (एकूण 417 औ. प्र. संस्था)

संकेतस्थळ: www.apprenticeship.gov.in, www.dvet.gov.in