शेतीकर्ज घेताना काय काळजी घ्यायला हवी

शेतीकर्ज घेताना काय काळजी घ्यायला हवी

शेतीकर्ज घेताना काय काळजी घ्यायला हवी

▪ शक्य झाले तेवढे नामांकित बॅंकांकडुनच किंवा सहकारी सोसायटीकडुनच कर्ज घ्यायला हवे.

▪ शक्यतो एकाच बॅंकेकडुन कर्जव्यवहार करावे आणि बॅंकेच्या शिफारशी एवढेच कर्ज घ्यावे .

▪ कर्ज घेत असतांना सातबारात नावे असणा-या सर्व व्यक्तींची संमती घ्यावी त्याशिवाय कोणतेही कर्ज घेऊ नये.

▪ शेतीवर कर्ज घेताना कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे अद्यावत असायला हवी

▪ कर्ज देण्यासाठी देण्यात येणा-या कागदपत्रांमध्ये आपले नाव व तसेच आपली संपूर्ण माहिती बरोबर आहे कि नाही याची सुद्धा पडताळणी व्यवस्थित करून घ्यावी.

▪ कर्ज मंजुर झाल्यानंतर सॅंक्शन लेटर वरील सर्व अटी ह्या काटेकोरपणे वाचून घ्याव्यात आणि मगच त्यावर सही करुन पुढील प्रक्रिया करून घ्यावी.

▪ व्याज दराची पुर्ण माहीती घेतल्यानंतर सर्वात आधी बॅंकेकडुन रिपेमेंट शेड्यूल्ड घ्यावे.

▪ कर्जाची रक्कम मर्यादा हि जास्त असली तरीहि रक्कम हि गरजेपुरतेच काढावी आणि खरोखर च शेतीकामासाठीच याचा वापर करावा.

▪ ज्या बँक मधून कर्ज घेतलेले असेल त्या बँकेत नियमित भेट देत राहावी व तुमच्या कर्ज खात्याचे स्टेटमेंट घेत राहावे.

▪ शेती मधून झालेले उत्पादन या विक्रितुन मिळेल त्या रकमेतून वेळोवेळी परतफेड करत राहावी शक्य होईल तेवढे तारखेपुर्वीच काही दिवस अगोदर आपली परतफेड करण्याचा प्रयत्न करावा.