शेवगा च्या शेंगाची लागवड कशी करायची
शेवगा हे एक कमी पाण्यात येणारे पिक आहे. शेवग्याची लागवड प्रामुख्याने दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते. बाजारात आज उपलब्ध असलेल्या विविध जाती साधारणतः 200 ते 300 शेंगा एका झाडापासुन मिळतात.
दक्षिण भारतातून जुलै ते सप्टेंबर व मार्च – एप्रिल महिन्यात शेवग्याची आवक जास्त असते.
भारत देशा व्यतिरिक्त पाकिस्तान, श्रीलंका, जमैका, सिंगापुर, क्युबा, आणि ईजिप्त देशात शेवग्याची लागवड केली जाते. तामिळनाडू राज्यात उन्हाळाच्या दिवसात शेवग्याची आवक मोठ्या प्रमाणावर असते.
जमिन आणि हवामान कसे असावे :
शेवगा च्या शेंगाची पिकाची लागवड हि समशितोष्ण आणि उष्ण अशा दोन्ही हवामानात केलेली चांगली असते. या पिकास कमी तापमान आणि जास्त तापमान सुद्धा सहन होत नाही त्यासाठी विशीष्ट काळजी घ्यायला हवी. जमिनीमध्ये क्लेचे प्रमाण अधिक असेल तर अश्या जमिनी मध्ये शक्यतो लागवड करु नये, तसेच पाणी जमीन हि पाणी धरुन ठेवणारी असेल तर त्या पिकांस ती मानवत नाही.
लागवड कशी करावी:
शेवगाच्या शेंगांच्या पिकाची लागवड हि त्यांच्या बीयांपासुन व तसेच त्यांचा काड्यांपासुन केली जाते. शेवगाच्या शेंगांच्या काड्यांपासुन केली जाणारी त्यांची लागवड हि बहुवार्षिक शेवग्याची केली जाते. वार्षिक शेवगाच्या शेंगांची लागवड हि त्यांच्या बियांपासून करावी लागते. साधारणतः एक एकर क्षेत्रात शेवगा लागवडी करिता 250 ग्रॅम बियाणे पुरेसे ठरते. प्लास्टिक पिशव्या भरुन किंवा बेड तयार करुन रोपांची निर्मिती केली जाते.
शेवगाच्या शेंगांच्या पिकाची लागवड हि शक्यता पाऊस पडल्यानंतर करावी, जेणेकरून पाण्याची उपलब्धता सुद्धा असेल कारण जुन-जुलै महिन्यात पाऊस जरी वेळेवर नाही आला तरी सुद्धा तुम्ही लागवड केलेली चालते. अधिक थंडीत किंवा उन्हाळ्यात लागवड करु नये.
साधारणतः शेवगाच्या शेंगांवच्या लागवडीनंतर 75 ते 80 दिवसांनी त्याचा वाढणारा शेंडा खुडल्यास तर त्याच्या जास्त प्रमाणात फांद्या मिळुन फळांची संख्या वाढण्यास चांगल्याप्रकारे मदत होते.
पाणी व्यवस्थापन कसे करावे:
यासाठी तुम्हाला फारसे काही करण्याची आवश्यकता नाही कारण शेवगाच्या शेंगा ह्या कमी कमी पाण्यात येणारे पिक आहे. तसेच पिकाची लागवड पाणी उपलब्ध असेल त्यावेळेस ड्रिप ईरिगेशन न वापरता सुद्धा केली जाते. या पिकांना 12 ते 15 दिवसांमधून एकदा सुद्धा पाणी दिले तरी पुरेसे होईल.
खत व्यवस्थापन कसे करावे:
शेवग्याच्या शेंगांसाठी तुम्हाला इथे चांगल्याप्रकारे खतद्यावे लागेल त्यावेळेसच तुम्हाला याचे चांगले पिक मिळेल. तसेच शेवगा हे पिक काही रासायनिक खतांच्या बाबतीत एवढे काही चोखंदळ असे पिक नाही आहे . शेवगाच्या पिकांना साधारणतः एका वर्षाला एक रोपासाठी 10 ते 12 किलो कुजलेले चांगले शेणखत द्यावे.
ड्रिप ईरिगेशन असेल तर फारच चांगले कारण उन्हाळ्यात या पिकांना 10 ते 12 लि. पाणी प्रती दिवस व ईतर ऋतू मध्ये त्याच्या निम्मे म्हणजेच 5 ते 6 लि. पाणी प्रती दिवस द्यावे लागले असे केल्यास या पासून शेवगाच्या शेंगांचे चांगले उत्पादन मिळू शकेल.
शेवगा च्या शेंगाची फळ धारणा केव्हा होते:
शेवगाच्या पिकांना अनेक वेळा वर्षभर फुले येत असतात. परंतु तसे पहिले तर ऑक्टोबर पासून ते नोव्हेंबर आणि एप्रिल पासून तर मे या काळामध्ये याचा आर्थिक फायदा आपल्याला मिळून देतील एवढी फुले याला येतात. फुले उमलून झाल्यानंतर काही दिवसांतच फळे हि जास्तीत जास्त लांबीचे आणि वजनाचे प्राप्त होतात.
शेवगा च्या शेंगांचे किती उत्पादन मिळू शकेल :
सध्या बाजारात आज उपलब्ध असलेल्या विविध प्रजातीच्या एका झाडापासून 250 ते 350 शेंगा मिळतात.