टोमॅटोवरील किडी
महाराष्ट्रात टोमॅटो हे पिक मे-जून, ऑगस्ट व ऑक्टोबर अशा वर्षातील तीन हंगामात घेतले जाते. त्यामुळे या टोमॅटोवरील किडी व रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावा-वर नियंत्रण ठेवणे फळांची प्रत तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने गरजेचे आहे. म्हणूनच या पिकावर येणा-या किडी व रोगांची लक्षणे, त्याबाबत करावयाच्या नियंत्रणात्मक उपाययोजना याविषयीची शास्त्रीय माहिती असणे आवशक आहे.
टोमॅटोवरील प्रमुख किडी :
फुलकिडे :
लक्षणे :
पिवळसर करड्या रंगाचे पिल्ले व प्रौढ पाने खरचटून त्यातून बाहेर येणारा रस शोषण करतात. त्यामुळे पानांवर पांढरे ठिपके तयार होऊन पिकामध्ये विषाणूजन्य “स्पॉटेड विल्ट” या रोगाचा प्रसार होतो.
नियंत्रण :
- रोपवाटिकेत बी उगवणीनंतर एन्डोसल्फान 35 टक्के प्रवाही 11 मि. लि. किंवा मॅलाथीऑन 50 टक्के प्रवाही 10 मि. ली. किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मि. ली. यापैकी एका किटकनाशकाची 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- पुनर्लागणीनंतर प्रादुर्भाव दिसताच वरीलपैकी कुठल्याही एका किटकनाशकाची 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करा.
- एकात्मिक किडव्यवस्थापनांतर्गत पद्धतींचा वापर करा.
पांढरी माशी :
लक्षणे :
पांढरट रंगाचे पिल्ले व प्रौढ पानांतून रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडुन पिकात ‘लिफकर्ल’ या विषाणुजन्य रोगाचा प्रसार होतो.
नियंत्रण :
- रोपवाटिकेत व पुनर्लागनिनंतर वर दिल्याप्रमाणे उपाय करा.
- एकात्मीक किडव्यवस्थापनांतर्गत उपायांचा अवलंब करा
हे सुद्धा वाचा – पालक लागवड कशी करावी