पालक लागवड कशी करावी
पालक लागवड ही भारतातील लोकांची अतिशय लोकप्रीय पाले भाजी आहे या पालक भाजीपाला च्या पिकाची लागवड वर्षभर केव्हाही करता येते. त्यासोबतच पालक या भाजीला सतत मागणी असते. पालका मधील पोषण मुल्ये पाहता पालकाची लागवड हि खूप मोठया प्रमाणावर करणे आवश्यक आहे.
हवामान कसे असावे:
पालक लागवड हे खूप कमी दिवसांत तयार होणारे हिवाळी पीक असल्यामुळे महाराष्ट्रा मध्ये कडक उन्हाळयाचे 1 ते 2 महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड केव्हाही करता येते. थंद्या हवामानात पालकाचे उत्पादन जास्त येऊन दर्जा चांगला राहतो. तसेच तापमान वाढल्यास पीक लवकर फूलो-यावर येते आणि दर्जा खालावतो.
जमीन कशी असावी :
पालकाचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते. खारवट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते. ज्या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत तेथे पालक घेता येते.
हे सुद्धा वाचा – वाटाणा लागवड कशी करावी
पालक लागवड कशी करावी:
महाराष्ट्रातील हवामानात पालकाची लागवड जवळ जवळ वर्षभर करता येते. खरीप हंगामातील लागवड जून-जूलैमध्ये आणि रब्बी हंगामातील लागवड सप्टेबर आक्टोबरमध्ये केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने हप्त्या हप्त्याने बियांची पेरणी करावी.
खते व पाणी व्यवस्थापन कसे करावे:
पालक हे कमी कालावधीचे पीक असले तरी हिरव्या टवटवीत पानांवर पिकाचे उत्पादन व प्रतीक्षा अवलंबून असल्याने पालकाला नत्राचा मोठया प्रमाणावर वापर करावा लागतो. तसेच पिकाला पाण्याचा नियमित पुरवठा करुन जमिनीत ओलावा राखणे आवश्यक आहे.
पालक ची काढणी व विक्री :
पेरणीनंतर सुमारे 1 महिन्याने पालक कापणीला येते. पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने 15 ते 30 सेंटीमीटर उंचीची झाल्यावर पानांच्या देठाचा जमिनीपासून 5 ते 7.5 सेमी भाग ठेवून वरील भाग खुडून अथवा कापून घ्यावा. साधारण्पणे हेक्टरी 10 ते 15 टन एवढे उत्पादन मिळते. शिवाय बियाण्याचे उत्पादन 1.5 टनापर्यंत मिळू शकते.
हे सुद्धा वाचा – ठिबक सिंचन करण्याचे फायदे