काही महत्वाच्या सरकारी योजना 2020

काही महत्वाच्या सरकारी योजना 2020

काही महत्वाच्या सरकारी योजना 2020

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थीना बसमध्ये सवलत योजना

  • लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी व त्याचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास भाड्यामध्ये सवलत दिली जाते.
  • योजनेच्या प्रमुख अटी : राज्य परिवहन महामंडळाच्याच बसमध्ये 100 टक्के सवलत दिली जाते.
  • आवश्यक कागदपत्रे : विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी पुरस्कारार्थीना दिलेले ओळखपत्र
  • लाभाचे स्वरूप असे : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये 100 टक्के सवलत दिली जाते.
  • या ठिकाणी संपर्क साधावा : संबधित आगार

 

महाराष्ट्र राज्यात व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र स्थापन करणे योजना

उमेदवारांची मुल्यमापन चाचणी करणे व समुपदेशन करुन रोजगार / स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याबाबत सहाय्य करण्यासाठी सर्व प्रवर्गासाठी ही योजना राबविण्यात येते.

योजनेच्या प्रमुख अटी :

  1. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये वेब पोर्टल येथे नाव नोंदणी केलेले 14 ते 40 वयोगटातील बेरोजगार उमेदवार.
  2. शैक्षणिक पात्रता 10 वी / 12 वी, आयटीआय, पदवीधारक, पदवीधारक किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षित, शिक्षण सोडलेले, कुशल किंवा अकुशल उमेदवार.
  3. नोकरीचा अनुभव असलेले किंवा नसलेले बेरोजगार उमेदवार.

आवश्यक कागदपत्रे :

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संकेतस्थळावर (www.maharojgar.gov.in) नोंदणी.

लाभाचे स्वरूप असे :

  • उमेदवार व उद्योजकांची नोंदणी करणे / नोंदणी वाढवणे.
  • उमेदवारांची मुल्यमापन चाचणी, वर्तणुक चाचणी, मानसशास्त्रीय चाचणी, कौशल्यचाचणी, कल चाचणी घेणे.
  • वरील चाचणीवर आधारीत आवश्यक त्या प्रशिक्षणाबाबत उमेदवारांना मार्गदर्शन / शिफारशी करणे.
  • उमेदवारांना रोजगाराकरीता मार्गदर्शन व समुपदेशन करुन मुलाखतीची संधी उपलब्ध करुन देऊन रोजगार उपलब्ध करुन देणे.
  • उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करुन त्याकरीता प्रोत्साहीत करणे व स्वयंरोजगार उपलब्ध होईल यादृष्टीने मदत करणे.
  • या ठिकाणी संपर्क साधावा : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय पत्ता : 3 रा मजला (विस्तारित), कोकण भवन, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई 400614.
  • संकेतस्थळ: www.maharojgar.gov.in

 

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना

गावांतील जन-जल-जंगल-जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास साधून उत्पन्न / उत्पादकता, रोजगार संधी वाढविणे, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे व संरक्षित क्षेत्रावरील मानवी दबाव कमी कारणे.

योजनेच्या प्रमुख अटी :

  • बफर क्षेत्रातील गावे, राष्ट्रीय उदयान / अभयारण्याच्या सिमेपासून 2 कि.मी. चे आत येणा-या गावांचा समावेश योजनेत करावा.
  • या योजनेतंर्गत केलेल्या कामांचा तपशील तसेच प्रस्तावित कामांपुरता आरखडा तयार करणे.
  • गाव निवडताना गाव समूह तत्व अवलंब करणे.

आवश्यक कागदपत्रे : सूक्ष्म आराखडा.

लाभाचे स्वरूप असे :

1. गावातील महिला व युवकांना स्वयंरोजगाराविषयी प्रशिक्षण देणे, क्षमता बांधणी करणे व रोजगाराची संधी.

2. उपलब्ध करून देणे, याकरीता औद्योगिक तज्ञांच व पर्यटन संस्थांचा सहभाग घेणे, गौण वनउपज संकलन, मुल्यवृध्दी व विक्रीस सहाय्य करणे.

3. निसर्ग पर्यटन व गृह पर्यटनाचा विकास करणे, अनुषंगिक क्षमता बांधणी करणे, प्रशिक्षण देणे.
पशु संसाधनांचा विकास, कृषि संसाधनांचा विकास, शौचालय, मैला प्रक्रिया.

4. जल संसाधनांचा विकास.

या ठिकाणी संपर्क साधावा : संबंधित व्याघ्र प्रकल्पाचे वनक्षेत्रपाल.

 

रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना

विविध व्यवसायांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाव्दारे उमेदवारांचे कसब व पात्रता वाढवून त्यांना नियमित रोजगार उपलब्ध करुन देणे अथवा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे स्वयंरोजगार सुरु करणे शक्य होण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेच्या प्रमुख अटी :

उमेदवारांनी संचालनालयाच्या वेबपोर्टलवर नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे :

नावनोंदणी केलेले कार्ड तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे

लाभाचे स्वरूप असे :

सदर योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा असून यासाठी पाठयवेतनाचे दर उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे दरमहा 300 ते 1000 रुपये प्रमाणे होते.

या ठिकाणी संपर्क साधावा :

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय, कोकणभवन, नवी मुंबई

संकेतस्थळ : http://www.maharojgar.gov.in

 

आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला पिके लागवड योजना

आदिवासी क्षेत्रातील शेतकरी कुटुंबाच्या आहारात जिवनसत्व व इतर आवश्यक पोषक द्रव्ये उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या भागासाठी पोष्टीक आहार योजना सुरु केली आहे. याकरिता अ, क या जिवनसत्वाची आणि लोह व खनिजाचा पुरवठा करण्याच्या फळे व भाजीपाला पिकाची आदिवासीच्या परस बागेत लागवड करुन आहार अन्नद्रव्याच्या दृष्टीने परिपूर्ण करण्यासाठी योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेची प्रमुख अट : लाभार्थी हा आदिवासी क्षेत्रातील कुपोषणग्रस्त गावांमधील आदिवासी असावा व त्याच्या कुटुंबाकडे शेतजमीन किंवा परसबाग असावी.

आवश्यक कागदपत्रे : अर्ज, 7/12 व 8-अ उतारा

लाभाचे स्वरूप असे: या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी 250 रुपयेप्रमाणे अनुदान देय आहे. लाभार्थीकडे स्वत:ची अवजारे नसल्यास प्रती लाभार्थी 150 रुपये किंमतीची फळझाडे / भाजीपाला लागवड साहित्य पुरवठा व 100 रुपये किंमतीच्या अवजारांचा संच पुरविण्यात येतो.

या ठिकाणी संपर्क साधावा : संबंधीत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी