पौष्टिक आणि जीवनसत्व युक्त टोमॅटो सूप रेसिपी

Easy Marathi रेसिपी टोमॅटो सूप

Easy Marathi रेसिपी टोमॅटो सूप पौष्टिक आणि जीवनसत्व युक्त

आज असे कोणीही नाही कि ज्यांना टोमॅटो सूप म्हटलं की त्यांचा जीभेला पाणी सुटत नाही. टोमॅटो सूप हा प्रत्येकालाच आवडतो तो अधिक पौष्टिक आणि जीवनसत्व सी ने भरलेला असतो हे सूप आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे आहे. हलका आहार म्हणून बरेच जण टोमॅटोचे सूप पिणे पसंत करतात. तर चला मग जाणून घेऊयात टोमॅटो सूप कसे केले जाते.

साहित्य :

  • छोटा चमचा चिरे
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • खिसलेले ओले खोबरे
  • सात ते आठ लाल आणि मोठे टोमॅटो
  • फोडणीसाठी तूप
  • मीठ चवी नुसार
  • हिंग छोटा चमचा
  • मिरची पावडर आवश्यकते नुसार
  • कडीपत्त्याची पाने

कृती :

  1. टोमॅटो चिरून एका कढईत मंद आचेवर शिजायला ठेवावी. त्यात थोडेसे पाणी घालावे.
  2. तसेच त्यातच खिडलेला नारळ शिजायला घालावा. त्यातच आवश्यकते नुसार लाल मिरची पावडर घालावी.
  3. टोमॅटो शिजल्यावर त्याची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. एका कढईत तूप तपण्यासाठी ठेवावे.
  4. त्यात चिरे, हिंग, कडीपत्ता घालावा, फोडणी चांगली तापल्यावर त्यात बारीक वाटलेले टोमॅटो घालावे.
  5. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. एक उखळी आल्यावर गरम गरम टोमॅटो साराचा आस्वाद घ्यावा.

हे सुद्धा वाचा – मसाले भात कसा बनवायचा | मसाले भात रेसिपी मराठी

 

हे सुद्धा वाचा – आरोग्य विषयी अत्यंत महत्वाच्या टिप्स ज्या तुमच्या नक्की कामात पडतील