Google Gmail काय आहे?

Google Gmail काय आहे

1.   Google Gmail काय आहे?

 • Gmail सुद्धा गूगल चे च प्रोडक्ट आहे पण gmail शिवाय तुम्ही गूगल चे कोणतेही प्रोडक्ट वापरु शकत नाही.
 • सांगायचे म्हणजे जर तुम्हाला गूगल चे इतर कोणतेही प्रोडक्ट वापरायचे असेल तर तुमचे gmail अकाउंट असणे बंधनकारक आहे,
 • त्याशिवाय तुम्ही त्या प्रोडक्ट ना लॉग इन करू शकणार नाही.
 • Gmail ही Google द्वारे प्रदान केलेली विनामूल्य मेसेजिंग सिस्टम आहे जी विनामूल्य ईमेल फाइल शेअरिंग करणे,
 • मग तो लिहलेला मजकूर असो किंवा ऑडीओ / व्हिडिओ असो इत्यादी तुम्ही अगदी विनामुल्य देशभरात कुठेही पाठवू किंवा मिळवू शकता.
 • इमेल म्हणजेच gmail ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मेल पाठविण्याची आणि प्राप्त करण्याची प्रणाली आहे.
 • आपण एक किंवा अधिक व्यक्तींना संदेश टाइप करू शकता
 • आपण फोटो, व्हिडिओ, पीडीएफ आणि इतर दस्तऐवज यासारख्या फायली सामायिक करू शकता.
 • प्रत्येक ईमेल (gmail) खात्याला गुगल 15 गिगाबाइट (15GB) पर्यंतच्या फाइल्स साठवण्याची (storage Capacity) परवानगी देतो.
 • यामुळे वापरकर्ते बर्‍याच मेल पाठवू आणि प्राप्त करू शकतात.
 • जीमेल (gmail) ही एक बहुभाषिक ईमेल सेवा आहे जिथे आपण ही सेवा जगभरातील 100 पेक्षा अधिक भाषांमध्ये वापरू शकता.
 • जसे हिंदी, उर्दू, नेपाळी, चीनी आणि बर्‍याच भाषांमध्ये उपलब्ध आहे.
 • जीमेलमधील इतर मेल सेवांप्रमाणेच तुम्हालाही प्रथमच साइन अप करावे लागेल किंवा रजिस्टर करावे लागेल.
 • Gmail वापरकर्ते संदेश, दुवे आणि संलग्नकांसह (Attachment) 25 एमबी पर्यंत मेल पाठवू शकतात
 • gmail वापरकर्ते एकाच वेळी 25 MB पर्यंतची संलग्नके (Attachments) पाठवू शकतात. जर वापरकर्त्यांना 25 MB पेक्षा जास्त फाइल किंवा एखादी संलग्नक पाठवायची असेल तर ते त्यासाठी गूगल ड्राइव्ह (Google Drive) वापरू शकतात.

 

2.   Gmail Address म्हणजे काय?

gmail address म्हणजे वापरकर्त्याचा ईमेल किंवा मेलिंग पत्ता (address) असतो तो कंपनी किंवा व्यक्तीचा असतो. जीमेल पत्ता (gmail address) ही प्रत्येक जीमेल (gmail) वापरकर्त्यांसाठी Google ने प्रदान केलेली इंटरनेट मेल ओळख आहे. जीमेल पत्ता (gmail address),  example@gmail.com असा दिसत असतो. हा जीमेल अ‍ॅड्रेस वापरुन तुम्ही त्या जीमेल खात्यावर विविध विषयांमध्ये मेल पाठवू किंवा मिळवू शकता.

3.   Gmail चा उपयोग काय आहे?

gmail हि सेवा वेगवेगळ्या कारणांसाठी वापरली जाते. मेल पाठविणे किंवा प्राप्त करण्यासाठी तसेच गुगल चे बाकी प्रोडक्ट किंवा सेवा वापरण्यासाठी खास करून gmail आयडी चा वपर केला जातो. वरील मी सांगितल्याप्रमाणे स्मार्टफोनच्या युगात 80% पेक्षा जास्त वापरकर्ते Android स्मार्टफोन वापरत आहेत. तर, आपल्या स्मार्टफोनमधील अ‍ॅप्स डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर सेवा वापरण्यासाठी आपले जीमेल (gmail) खाते असणे आवश्यक आहे, जीमेल खात्याशिवाय आपण प्ले स्टोअर वापरू शकत नाही. त्याचप्रमाणे, जीमेल (gmail), यूट्यूब (YouTube), नकाशे (Map), गूगल असिस्टंट (Google Assistant), गूगल ड्राईव्ह (Google Drive), हँगआउट्स (hangouts), ट्रान्सलेट (translate) व तसेच ब्लॉगर (Blogger), गूगल एड्स (Google Ads), एडसेंस (Adsense), सर्च कन्सोल (Search Console), Analytics आणि इतर बर्‍याच सर्व Google सेवा वापरण्यासाठी वापरली जाते. ह्या सर्व सेवा तुम्हाला जीमेलच्या एका खात्यातून मिळू शकतात.