मन की बात नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी साधला संवाद

मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी

मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी साधला संवाद

मन की बात या कार्यक्रमातील काही महत्वाचे मुद्दे :

  • भारताच्या आयुर्वेद आणि योग यांची चर्चा देशभरात आहे.
  • पोलिस, सफाई कर्मचारी यांच्याविषयी जनतेचा दृष्टीकोन बदलला आहे,
  • पोलीस गरजूंना अन्न आणि औषध देत आहेत, यामुळे पोलिसांशी भावनिक नातं जोडलं आहे.
  • डॉक्टर, नर्सवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करण्यासाठी अध्यादेश आणला.
  • मास्क म्हणजे आजारपणा नाही, मी तर गमछा वापरण्याचा सल्ला देतो.
  • कोरोनाविरुद्धची लढाई ‘पीपल ड्रिव्हन’.
  • पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत अनेकांच्या खात्यात थेट रक्कम जमा.
  • केंद्र आणि राज्य सरकार यांचा प्रत्येक विभाग एकत्र येऊन काम करत आहे.
  • तुमच्या हृदयातील भावना कोरोनाविरोधातील लढाईला बळ देत आहेत, कोणी मास्क बनवतं,
  • कोणी सबसिडी सोडत आहे, कोणी पेन्शन तर कोणी पुरस्काराची रक्कम पीएम निधीला देत आहे.
  • मास्क हे सभ्य समाजाचं लक्षण, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे दुष्परिणामही समजत आहेत.
  • आपल्या शहर, गाव, ऑफिस, गल्लीत कोरोना पोहोचला नाही, म्हणजे तो कधीच येणार नाही, असा अतिआत्मविश्वास बाळगू नका,
  • जगाचा अनुभव पाहून आपण शिकलो आहोत, नजर हटी, दुर्घटना घटी, अतिउत्साहात निष्काळजीपणा दाखवू नका.
  • रमझानच्या महिन्यात संयम, संवेदनशीलता याचं दर्शन घडवूया, ईदच्या आधी जगातून कोरोना नष्ट होईल, याचे प्रयत्न करूया.
  • आजचा दिवस अक्षय्य तृतीयेचा, आपली धरती, पर्यावरण अक्षय्य राहील, असा संकल्प करुया.
  • कोरोनाविरोधात प्रत्येक जण आपले सामर्थ्य ओळखून लढा देत आहे.
  • कोरोना संकटात भारताने इतर देशांना औषधं दिली नसती, तर कोणी दोष दिला नसता,
  • मात्र आपण प्रकृती-विकृती न मानता संस्कृतीचं दर्शन घडवलं आणि औषधांची मदत पोहोचवली,
  • नागरी उड्डाण आणि रेल्वे विभागातील कर्मचारी सहभागी, 500 टन वैद्यकीय साहित्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवत आहेत.
  • http://covidwarriors.gov.in या माध्यमातून सव्वा कोटी डॉक्टर, नर्स असे अनेक कोविड-19 लढवय्ये एकत्र जोडले गेले आहेत.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले करोनाचा गुणाकार कमी करण्यात आपण यशस्वी

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आज संबोधित केलं आहे.

कोरोना लढ्याविषयीची परिस्थिती, उपाययोजना, आणि एकंदरीतच आढावा मुख्यमंत्र्यांनी या संवादातून मांडला असून अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे.

  • सण उत्सवाच्या काळातही राज्यात सर्वधर्मियांनी संयम दाखवला असून लॉकडाउनमुळे परिस्थितीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
  • वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन झाल्यामुळे परिस्थिती काही प्रमाणात का होईना आटोक्यात येण्यास मदत झाली आहे.
  • कोरोनाचा वाढत फैलाव तसेच त्याचा होणार गुणाकार लॉकडाऊनमुळे कमी झाला आहे. तसेच आता विषाणूची वाढती वाढ रोखण्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे.
  • डॉक्टरांसह आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि पोलीस कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आघाडीवर असून या लढ्यात 2 पोलीस शाहिद झाले आहेत.
  • या लढ्यातील शहीदांसाठी त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करू, पण माणूस गेला आहे. डॉक्टरांसह इतर संबंधित कर्मचारी त्याचप्रमाणे अधिकारी जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.

 

बिपीन रावत जी म्हणाले लष्कर कोणत्याही ऑपरेशनल टास्कसाठी तयार आहे

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. या लढ्यात लष्कारानेही पुढाकार घेतला आहे.

कोरोनाशी सामना करण्यासाठी लष्कर कोणत्याही ऑपरेशनल टास्कसाठी तयार आहे, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी सांगितले.

  • काही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. धैर्य आणि शिस्त आम्हाला कोरोनाच्या संकटावर मात करण्यास मदत करेल.
  • वैज्ञानिक आणि वैद्यकीय संशोधनाशी संबंधित इतर संस्थां देशातील वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन आल्या आहेत,
  • आपल्या सर्व जवानांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केले आहे. आम्ही हे सुनिश्चित करण्यास सक्षम आहोत की कोरोनाचा प्रसार होणार नाही.
  • कोरोनाचा परिणाम तिन्ही दलात मर्यादित प्रमाणात झाला आहे. शिस्त व धैर्य आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत झाली आहे.

या कोरोनाने आपल्याला हा धडा शिकविला आहे की आता स्वावलंबी होण्याची वेळ आली आहे.

 

हे सुद्धा वाचा – लॉकडाऊनच्या काळात हे एप ठरले सर्वाधिक लोकप्रिय आणि महत्वाचे

 

अजित पवार म्हणाले महाराष्ट्राला अतिरिक्त एक लाख कोटी द्या

  • महाराष्ट्रासह सर्व राज्यांना आर्थिक पॅकेज द्या, असं पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे.
  • केंद्राला द्यायचा 10 हजार 500 कोटी रुपयांचा हप्ताही दोन वर्ष पुढे ढकलण्याची मागणी पवारांनी केली आहे.
  • सुधारित अंदाजानुसार अपेक्षित महसुली तूट 1 लाख 40 हजार कोटी इतकी असेल. हे अपेक्षित उत्पन्नाच्या सुमारे 40 टक्के आहे.
  • प्रस्तावित खर्च टिकवण्यासाठी राज्याला एक लाख कोटींच्या तुटीचा सामना करावा लागणार आहे, हे स्पष्ट असल्याचं पवारांनी पत्रात लिहिलं आहे.
  • अमेरिका, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया अशा जवळपास सर्वच देशांनी जीडीपीच्या जवळपास दहा टक्के आर्थिक पॅकेजेस जाहीर केली आहेत.
  • अशाप्रकारे, आरबीआयसह भारत सरकारकडून राज्यांना योग्य आर्थिक पॅकेज देण्याची तयारी केली जाऊ शकते, असं पवारांनी सुचवलं आहे.
  • ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दल पवारांनी चिंताही व्यक्त करत महाराष्ट्राला अतिरिक्त 1 लाख कोटी देण्याची मागणी केली आहे.
  • ‘अंदाजे 3 लाख 47 हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती 2020-21 च्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मिळाली.

हे सुद्धा वाचा – ऑनलाइन पैसे कमावण्याचे 10 यशस्वी मार्ग