काँग्रेस मोदी सरकारवर टीका करण्यात व्यस्त…
संपूर्ण देश कोरोनाशी लढत असून काँग्रेसला मात्र टीका करण्याशिवाय काहीही दिसत नाही असे म्हणत प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे.
आजच राहुल गांधी यांनी DA अर्थात महागाई भत्त्यात कपात करुन केंद्र सरकारने अमानवी आणि असंवेदनशील निर्णय घेतल्याचे ट्विट केलं आहे. त्यावर या टीकेला आता प्रकाश जावडेकर यांनी उत्तर दिलं आहे.
प्रकाश जावडेकर काय म्हणाले :
▪️ सध्या देश कोरोना विषाणूचा सामना करत आहे आणि दुसरीकडे काँग्रेस मात्र मोदी सरकारवर टीका करण्यातच धन्यता मानत आहे.
▪️ सद्याच्या परिस्थितीत काँग्रेसचे नेते ज्याप्रमाणे वागत आहेत त्याचे उत्तर त्यांना कधीतरी द्यावे लागेलच.
दरम्यान, अशा आशयाचे ट्विट करत प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
थोडक्यात संक्षिप्त घडामोडी
▪️ भारतात आतापर्यंत 23077 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण, तर 718 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू; 4749 कोरोनाग्रस्त उपचारानंतर झाले बरे
▪️ केंद्र सरकारकडून बँकिंग सेवेचा अत्यावश्यक सेवेत समावेश; याअंतर्गत बँकांना 21 एप्रिलपासून 6 महिन्यांपर्यंत करता येणार नाही संप
▪️ मनिपूर आणि त्रिपुरा या दोन्ही राज्यांची कोरोनाच्या विळख्यातून झाली सुटका; गोवा ठरले देशातील ग्रीन झोन ठरणारे पहिले राज्य
▪️ बुलेट ट्रेन प्रकल्पाला स्थगिती देण्याऐवजी महागाई भत्त्यात कपात करणं असंवेदनशील; राहुल गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र
▪️ भारत-चीन सीमेवर एलएसीपर्यंत जाणारा पूल ‘बीआरओ’ने केला सुरु; पुलावरून चीनच्या सीमेपर्यंत 40 टन वजनी वाहने जाऊ शकणार
▪️ महाराष्ट्रात आतापर्यंत 6430 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण, तर 283 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू; 840 कोरोनाग्रस्त उपचारानंतर झाले बरे
▪️ महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या घटली; सुरुवातीला धोकादायक असलेल्या 14 क्षेत्रांची संख्या नियंत्रण मिळवल्याने आली 5 वर
▪️ दहावीच्या निकालावर कोरोनाचे सावट; उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांना निकालासाठी करावी लागणार प्रतीक्षा
▪️ रियलमीचा ‘X50’ सीरिजचा ‘X50m 5G’ स्मार्टफोन लाँच; स्मार्टफोनमध्ये 5 कनेक्टिविटी, 4 रियर कॅमेऱ्यासह फास्ट प्रोसेसरचा असणार सपोर्ट
▪️ दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांच्या ‘स्थलपुराण’ या मराठी चित्रपटाचा ‘बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’तील निवडक 10 चित्रपटांच्या यादीत समावेश
देशभरात आजपासून (दि.25-04-2020) काही अटींवर दुकाने उघडण्यास केंद्र सरकारची परवानगी; लाखो दुकानदारांना मिळणार दिलासा, तूर्तास मॉल्स राहणार बंद
▪️ चीनहून मागवलेले सदोष अँटिबॉडी किट परत करणार; केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे स्पष्टीकरण
▪️ राज्यात कोरोनाचे 394 नवे रुग्ण; दिवसभरात 18 जणांचा मृत्यू, कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 817 वर
▪️ अहमदनगर : जामखेडमध्ये एका बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सात जणांना लागण झाल्याचे आतापर्यंत उघड; त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरूच
▪️ नागपूरमधील बहुचर्चित आठ वर्षीय बालक युग चांडक अपहरण-हत्याप्रकरणी दोन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मरेपर्यंत ठोठावली जन्मठेप
▪️ विधान परिषदेच्या नऊ सदस्यांची मुदत शुक्रवारी संपली असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या निवडणुका ढकलल्या पुढे
▪️ कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुन्हा एकदा मुंबई रेल्वे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज; मध्य आणि पश्चिम रेल्वे 26 हजार पीपीई किट देणार
▪️ मोदी सरकारने गरीबांसाठी केलेल्या उपाय योजना अपुऱ्या; नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांची मोदी सरकारवर तिखट शब्दांमध्ये टीका
▪️ भारतीय क्रिकेट संघ कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांवर अवलंबून; ऑफस्पिनर हरभजन सिंगचे मत
▪️ बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची ‘पाताल लोक’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार; टीजर प्रदर्शित
हे सुद्धा वाचा – तेलंगानामध्ये सरकार ने वाढवले लॉकडाउन
देशभरात आजपासून दुकाने उघडणार!
कोरोनाला रोखण्यासाठी महिनाभरापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात काही अटींवर दुकाने उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असून या निर्णयामुळे लाखो दुकानदारांना दिलासा मिळणार आहे.
परवानगी : गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
मॉल्स बंदच : आज (दि.25) सकाळपासून हा आदेश लागू होणार आहे. महानगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीतील निवासी भाग व परिसरातील दुकाने या आदेशानुसार उघडता येणार आहेत. मात्र शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे सर्व मॉल्स तूर्तास बंदच राहणार आहेत.
अटी :
● जी दुकाने नोंदणीकृत आहेत त्यांनाच ही परवानगी असणार.
● दुकानात 50 टक्के कर्मचारीच काम करू शकणार.
● सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करायचे आहे.
● मास्क व हँड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक.
गृहसचिव अजय भल्ला म्हणाले : पालिका व नगरपरिषद हद्दीतील बाजारपेठांमधील दुकाने उघडण्यास मनाई आहे. ही दुकाने 3 मे पर्यंत उघडता येणार नाहीत. सिंगल ब्रॅण्ड व मल्टिब्रॅण्ड मॉल्स उघडण्यासही परवानगी नाही. त्याचवेळी पालिका वा नगरपरिषद हद्दीबाहेरील दुकाने उघडता येणार आहेत, असे गृहसचिव अजय भल्ला यांनी स्पष्ट केले.
कोरोना हॉटस्पॉट व कंटेनमेंट झोनमधील दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. या भागांत दुकाने उघडण्याची मुभा मिळणार नाही, असे आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे.
- जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या देशात 24 हजार 506 वर पोहचली आहे. चोवीस तासांत 57 जणांचा मृत्यू तर 1429 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
- देशात आतापर्यंत आढळलेल्या 24 हजार 506 जणांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले 18 हजार 668 रुग्ण, रुग्णालयातून सुट्टी दिलेले 5 हजार 063 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 775 जणांचा समावेश आहे.
- लॉकडाउन : कोरोनाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील रुग्णसंख्या 24 हजार 506 झाली आहे. जर भारताने वेळेत लॉकडाउन जाहीर केला नसता तर रुग्णांच्या संख्या एक लाखांहून अधिक असती अशी माहिती उच्चाधिकार गट-क्रमांक (1) चे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.
- पॉल म्हणाले : “लॉकडाउन लागू केला नसता तर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखांहून अधिक असता, त्यामुळे लॉकडाउन योग्य वेळी अमलात आणला गेला”.
- सर्वाधिक संख्या : केंद्राच्या यंत्रणा युद्धपातळीवर राबत असल्या तरी कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येण्यात अपयश येत आहे. शुक्रवारी देशभरात नव्या 1 हजार 752 रुग्णांची भर पडली असून ही देशात एक दिवसात नोंदविलेली सर्वात मोठी संख्या आहे.