गवार लागवड कशी करायची

गवार लागवड कशी करायची

गवार लागवड कशी करावी

गवार लागवड हे शेंगवर्गीय भाजीपीक महारष्ट्राच्या सर्व भागामध्ये कमी – अधिक प्रमाणात घेतले जाते. ह्या पिकाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे राजस्थानरख्या अति कमी पावसाच्या राज्यामध्ये हे पीक बीजोत्पादनासाठी व्यापारी पीक म्हणून घेतले जाते. सोप्या तंत्राचा वापर केल्यास गवारीसारख्या अत्यल्प खर्चाच्या पिकातून भरपूर पैसा मिळविता येतो.

गवार लागवडीसाठी जमीन कशी असावी:

हलक्या जमिनीत गवारीची रोपे खुरटी राहून शेंगा लवकर येतात. गाळाच्या जमिनीत गवार चांगली व उत्तम प्रतीची येते. खताची गरज जाणवत नाही व उत्पन्नही चांगले मिळते.

गवार लागवडीसाठी हवामान कसे असावे:

थंडीत गवार वाढत नाही, शेंग उशिरा लागते. शेंगांवर माव्याचा प्रादुर्भाव अधिक जाणवतो

गवार लागवड :

 • भाजी पीक म्हणून गवार करण्यासाठी लागवड फोकून, पेरून, टोकून या पद्धतीने करता येते.
 • गवारीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते.
 • उन्हाळी हंगमास गवारीची लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करतात.

गवार लागवडी वर होणारे कीड  याचे व्यवस्थापन कशे करावे  :

 • गवारीच्या पिकावर मावा व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होतो.
 • किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 ईसीक 1.5 मिली किंवा मोनोक्रोटोफाँस 36 डब्लूसी किंवा मिथिलडिमेटाँन 25 ईसी 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

खते व पाणी व्यावस्थापन कश्या पद्धतीने करावी:

 • गवार हे शेंगवर्गातील कोरडवाहू म्हणून पिक घेतल्यास त्याला फारशी गरज लागणार नाही.
 • बागायती पिकास लागवडीपूर्वी 50 किलो नत्र, 60 किलो पालाश द्यावे.
 • जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे.
 • फुले आल्यापासून शेंगाचा बहार पूर्ण होईपर्यंत नियमित पाणी द्यावे.

गवार लागवड ची काढणी कशी करावी व उत्पादन किती होईल  :

 • हिरव्या कोवळ्या मात्र पूर्ण वाढलेल्या शेंगाची नियमित तोडणी करावी.
 • शेंगाची तोडणी 3 ते 4 दिवसांतून करावी.
 • सर्व साधारणपणे हिरव्या शेंगाचे हेक्टरी 100 ते 200 क्विंटल उत्पादन मिळते.