उन्हाळी भुईमूग लागवड कशी करायची

उन्हाळी भुईमूग लागवड कशी करायची

उन्हाळी भुईमूग लागवड कशी करायची

उन्हाळी हंगामातील भुईमूग लागवडीसाठी TAG 24 व SB 11 या जातींची निवड करावी. जानेवारी 15 ते 20 तारखेदरम्यान पेरणी करावी. जास्तीत जास्त उशिरा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पेरणी पूर्ण करा.

उन्हाळी भुईमूग लागवड लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी.

भुईमूग लागवड चे खत व्यवस्थापन कसे करावे:

जमिनीत शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी भरखत शेतात पसरावे.
25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद प्रती हेक्टरी द्यावे. आवश्यक असल्यास प्रती हेक्टरी 30 किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावा.

भुईमूग लागवड ची पेरणी कशी करावी :

भुईमूग पेरणी सपाट वाफा पद्धत किंवा सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी. पेरणी टोकण पद्धतीने करताना एका ठिकाणी एकच बी लावावे. बियाण्याची उगवणशक्ती कमी असल्यास दोन बियाण्यातील अंतर कमी करावे. पेरणी दोन ते अडीच इंच खोल करावी. उगवण झाल्यानंतर खांडण्या ताबडतोब भरून घ्याव्यात. पेरणीनंतर हलके पठालण करून बी झाकावे. त्यामुळे पक्षी बी खाणार नाहीत.

उत्पादन किती मिळू शकते :

भुईमूग लागवड च्या जमिनीचे आणि  पाण्याचे योग्य नियोजन केल्यास याचा वाळलेल्या शेंगाचे सरासरी उत्पादन प्रतिहेक्टरी 24.26 क्विंटल मिळते.

ऑनलाइन पैसे कमविण्याचा मार्ग