अवकाळी पावसामध्ये पिकांची काळजी कशी घ्यावी!

अवकाळी पावसामध्ये पिकांची काळजी कशी घ्यावी!

अवकाळी पावसामध्ये पिकांची काळजी कशी घ्यावी!

आज सर्वत्र हवामानात बदल घडलेला दिसून येत आहे. त्यामुळे आपण सर्व शेतकरी अवकाळी पावसाने त्रासलो आहोत, मात्र यावर उपाय म्हणून काही गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. चला तर मग पाहूया, या पडलेल्या किंवा पडत असलेल्या पावसामुळे विविध भाज्या व फळबागामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी उपाययोजनाचा अवलंब करा…!

पाणी :

  1. सध्या पडलेल्या आणि पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे सर्व पीक क्षेत्रातील अतिरिक्त पाण्याचा निचरा तत्काळ करावा.
  2. ओलीचा फायदा पुरेपूर करून घेण्यासाठी वापश्‍यावर रब्बी पिकांची पेरणी करावी.
  3. कापून / काढून शेतात पडलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र त्यावर शक्‍य त्या उपाययोजना करून नुकसान टाळण्याचे प्रयत्न करावा.
  4. काढणीयोग्य उभ्या अवस्थेतील पिकांची काढणी / मळणी पाऊस थांबल्यानंतरच करावी.

आंबा :

आंब्यावर फुलकिडे तसेच तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते, त्यासाठी क्विनॉलफॉस 20 मि.लि. किंवा थायामेथोक्‍झाम 4 ग्रॅम वा इमिडॅक्‍लोप्रिड 4 मि.लि., मेटॅरिझीयम अनासोप्ली 50 ग्रॅम या कीटकनाशकांची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.