हिवाळ्यामध्ये कांदा लागवड कशी करावी

हिवाळ्यामध्ये कांदा लागवड कशी करावी

हिवाळ्यामध्ये कांदा लागवड कशी करावी

हिवाळ्यामध्ये कांदा लागवड हे पीक कमी वेळेत येणारे, तुलनात्मक दृष्ट्या कमी भांडवली खर्चाचे मात्र जास्त उत्पन्न देणारे व्यापारी पीक आहे. कांदा पिकविण्यात महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच कोकणात व विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा काही  जिल्‍हयांमध्‍ये कांद्याची लागवड केली जाते.

जमीन कशी असावी:

पाण्‍याचा निचरा उत्तम असणारी, भुसभूशीत, सेंद्रिय खतांनी परिपूर्ण असलेली मध्‍यम ते कसदार जमिन कांद्याला लाभदायक.

हवामान कसे असावे:

कांदा हे हिवाळी हंगामातील पिक असून महाराष्‍ट्रातील सौम्‍य हवामानात कांद्याची 2 ते 3 पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून 1 ते 2 महिने हवामान थंड लागते.

लागवड कशी करावी:

खरीप पिकासाठी गादी वाफ्यावर रोपे तयार करतात. 1 हेक्टर लागवडीसाठी 15 ते 20 आर (गुंठे) वर तयार केलेली रोपे पुरेशी पडतात. हेक्टरी 10 किलो बी लागते. रोपे तयार करण्यासाठी जमीन भुसभुशीत करून त्यात 4 -5 गाड्या कुजलेले शेणखत व 2.5 किलो नत्र, व ५ किलो स्फुरद टाकावे. पेरणीपूर्वी बी 3 ग्राम थायरम हे बुरशीनाशक 1 किलो बियाण्यास या प्रमाणात चोळावे.

पाणी व्यवस्थापन कसे करावे:

कांदा पिकाला नियमित पाणी द्यावे लागते. खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्‍या अंतराने तर उन्‍हाळी रब्‍बी हंगामात 6 ते 8 दिवसांनी जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.

किती उत्पादन मिळू शकेल :

● कांदयांचे पीक लागवडीनंतर 3 ते 4.5 महिन्‍यात काढणीस तयार होते.
● कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत पिवळा पडतो व पात आडवी पडते.
● 60 ते 75 टक्‍के माना मोडल्‍यावर कांदा काढणीस पक्‍व झाल्याचे समजावे.
● काढणीनंतर 4 ते 5 दिवसांनी कांदा पातीसकट शेतात लहान लहान ढिगा-याच्‍या रूपाने ठेवावा.

हेक्‍टरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.