भूमिहीन बाबत स्वयंघोषणापत्र | भूमिहीन प्रमाणपत्र | 2020 डाउनलोड PDF | Landless Certificate

भूमिहीन बाबत स्वयंघोषणापत्र | भूमिहीन प्रमाणपत्र | 2020 डाउनलोड PDF | Landless Certificate

भूमिहीन बाबत स्वयंघोषणापत्र | भूमिहीन प्रमाणपत्र | 2020 डाउनलोड PDF | Landless Certificate

महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आहेत त्यापैकी एक म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना भूमिहीन शेतमजूरांना शेती उपलब्ध करू देणारी योजना आहे. या योजनेला फॉर्म भरण्याकरिता तुम्हाला काही कागदपत्रे लागतात त्यापैकीच एक म्हणजे भूमिहीन बाबत स्वयंघोषणापत्र | भूमिहीन प्रमाणपत्र | Landless Certificate.

easymarathi.com या वेबसाईटवर आम्ही तुम्हाला वेळोवेळी शासनाच्या विविध  सरकारी योजने विषयी माहिती पुरवीत असतो व तसेच त्यांना लागणारे कागदपत्रे सुद्धा तुम्हाला या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.

भूमिहीन म्हणजे काय ?

असा व्यक्ती किंवा शेतमजूर कि ज्याच्याकडे कोणतीही शेती नाही मग ती कोरडवाहू असो वा बागायती असो अश्या व्यक्तीस भूमिहीन म्हणतात

भूमिहीन बाबत स्वयंघोषणापत्र यामध्ये काय व कसा लिहावा

  1. मी – स्वतःचे पूर्ण नाव.
  2. आधार नंबर –  स्वतःचा आधार क्रमांक.
  3. मौजे – तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाचे नाव येथे लिहिणे.
  4. ता. – तुम्ही जिथे राहता तो रहिवासी तालुक्याचे नाव.
  5. जि. – तुमच्या रहिवासी जिल्ह्याचे नाव.
  6. मौजे – ज्या गावात किंवा ज्या ठिकाणी तुमची शेती नाही आहे त्या गावचे नाव लिहावे.

अश्या प्रकारे वरीलप्रमाणे तुम्ही भूमिहीन आहे  म्हणजेच तुम्ही तुमच्या कडे आता कुठलीही शेती नाही असे तुम्हाला भूमिहीन बाबत स्वयंघोषणापत्र ( भूमिहीन प्रमाणपत्र | Landless Certificate) लिहून मान्य करावे लागेल.

मी याद्वारे घोषित करतो/करते कि, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि/किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पत्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे. करिता स्वयंघोषणापत्र लिहून दिले आहे.

आणि शेवटी तुमची सही किंवा अंगठा आणि दिनांक टाकणे.

खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून भूमिहीन बाबत स्वयंघोषणापत्र | भूमिहीन प्रमाणपत्र | Landless Certificate | 2020 PDF डाउनलोड करा.

डाउनलोड

ऑनलाइन पैसे कमविण्याचा मार्ग