अल्पभूधारक बाबत स्वयंघोषणापत्र 2020 डाउनलोड PDF

अल्पभूधारक बाबत स्वयंघोषणापत्र 2020 डाउनलोड PDF

अल्पभूधारक बाबत स्वयंघोषणापत्र 2020 डाउनलोड PDF

महाराष्ट्र शासनाच्या वेळोवेळी वेगवेगळ्या योजना येतात आणि यामधील सर्वात जास्त योजना ह्या अल्पभूधारक शेतकरी यांच्याच असतात. अल्पभूधारक शेतकरी योजना 2020 साठी लागणारे अत्यंत आवश्यक कागदपत्रापैकी एक म्हणजे अल्पभूधारक स्वयंघोषणापत्र 2020 डाउनलोड PDF ऑनलाइन

अल्पभूधारक म्हणजे किती एकर शेती होय

भारत सरकारने पूर्ण अभ्यास करून काही प्रमाणात असे ठरवले आहे की अल्पभूधारक शेतकरी म्हणजे ज्याच्या नावावर जास्तीत जास्त 5 एकर किंवा त्या पेक्षा कमी जमीन आहे असा शेतकरी म्हणजे अल्पभूधारक शेतकरी होय

उदा. –  5 एकर = 2 हेक्टर = २०० गुंठे इतके होय

अल्पभूधारक बाबत स्वयंघोषणापत्र यामध्ये काय व कसा लिहावा

  1. मी – स्वतःचे पूर्ण नाव.
  2. आधार नंबर –  स्वतःचा आधार क्रमांक.
  3. मौजे – शेती कोणत्या गावात आहे .
  4. ता. – तुम्ही जिथे राहता तो रहिवासी तालुक्याचे नाव.
  5. जि. – तुमच्या रहिवासी जिल्ह्याचे नाव.
  6. मौजे – ज्या गावात किंवा ज्या ठिकाणी शेती आहे त्या गावचे नाव लिहावे.
  7. गट नंबर – तुमच्या शेतीचा गट नंबर.
  8. क्षेत्र – तुमच्या शेतीचे एकूण क्षेत्रफळ हेक्टर मध्ये लिहावी.

अश्या प्रकारे वरीलप्रमाणे तुमची जमीन असून तुम्ही तुम्ही अल्पभूधारक आहे असे तुम्हाला मान्य करावे लागेल.

मी याद्वारे घोषित करतो/करते कि, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि/किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पत्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे. करिता स्वयंघोषणापत्र लिहून दिले आहे.

आणि शेवटी तुमची सही किंवा अंगठा आणि दिनांक टाकणे.

खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून अल्पभूधारक बाबत स्वयंघोषणापत्र PDF डाउनलोड करा.

अल्पभूधारक बाबत स्वयंघोषणापत्र PDF डाउनलोड