Google Assistant म्हणजे काय?

Google Assistant म्हणजे काय

1. Google Assistant म्हणजे काय?

Google Assistant एक अशी सर्व्हिस आहे कि तुम्ही तिथे सर्वकाही फक्त तुमच्या आवजाने हाताळू शकता.

उदा. तुमच्या एंड्राइड फोन मध्ये Google Assistant नावाचा फिचर सुरु (ON) आहे.

त्यासाठी तुम्हाला फ़क्त तुमच्या मोबाइल फोन मध्ये तुम्हाला जे हवे असेल ते बोलून पाहू शकता

किंवा कोणाला फोन करायचा असेल तर त्या व्यक्तीचे नाव घेऊन फोन सुद्धा करू शकता.

तसेच अलार्म लावणे गुगल वर माहिती सर्च करणे इत्यादी सारख्या बऱ्याच गोष्टी Google Assistant तुमच्यासाठी करू शकतो.

गुगल ने या प्रोडक्टचे नाव सुद्धा असिस्टंट (Assistant) च ठेवले म्हणजे जणू हा तुमच्या सहाय्यक (Assistant) सारखाच तुमच्यासाठी काम करणार आहे जे तुम्ही याला सांगणार तसेच तो करणार.

Google Assistant म्हणजे काय

2. Google Assistant कसे वापरायचे?

  1. दिलेल्या अधिकृत लिंक वर क्लिक करून तुम्ही हे एप डाउनलोड करून घ्या. https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.googleassistant
  2. एप डाउनलोड झाल्यानतर तुम्ही तिथून एप सुरु करू शकता पण याला गुगल ने एक शॉर्टकट सुद्धा दिलेले आहे ते म्हणजे तुमच्या मोबाइल चे होम बटण (Home Key) यावर क्लिक करा.
  3. होम बटण वर क्लिक केल्यानंतर गुगल असिस्टंट एकेवेळेस तुमच्याकडून परवानगी घेईल त्याला तुम्ही हो करा.
  4. या नंतर गुगल असिस्टंट तुम्हाला तीन वेळा OK Google बोलायला लावणार आहे तसे तुम्ही त्यामध्ये बोला. यामुळे होणार असे कि गुगल असिस्टंट तुमचा आवाज ओळखण्याची प्रक्रिया करत आहे जेणे करून या नंतर तुम्ही गुगल असिस्टंट ला कोणतीही कमांड किंवा काम सांगितले तर ते त्याला लगेच कळेल.
  5. अश्याप्रकारे तुमचे Google Assistant एप वापरायला तयार झाले आहे. यासाठी आता तुम्हाला जेव्हा Google Assistant ची गरज भासेल त्यासाठी तुम्ही फक्त होम बटण वर क्लिक करावे व Google Assistant ला कमांड द्यावी.

ऑनलाइन पैसे कमावण्याचे 10 यशस्वी मार्ग