ATM ए. टी. एम. मशीन मध्ये पैसे अडकल्यास काय करावे?

ATM ए. टी. एम. मशीन मध्ये पैसे अडकल्यास काय करावे
ATM ए. टी. एम. मशीन मध्ये पैसे अडकल्यास काय करावे

ATM ए. टी. एम. मशीन मध्ये पैसे अडकल्यास काय करावे? | What to do if money gets stuck in ATM Machine

ATM ए. टी. एम. मशीन मध्ये पैसे अडकल्यास काय करावे? यासाठी कसा अर्ज करावा आणि कुठे अर्ज करावा आपले पैसे परत कशे मिळतील याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखामध्ये मिळणार आहे.

आज आधुनिक क्रांतीमुळे भारत हा देश चांगल्या प्रकारे प्रगती करत त्यापैकीच एक म्हणजे डिजिटल स्वरुपात पैशाची देवाण घेवाण, तरी सुद्धा आज आपण सरकारी बँक मध्ये गेले असता तुम्हाला सतत तिथे गर्दी चा सामना करावा लागतो, अश्यावेळेस आपण पैसे काढण्याकरिता ATM ए. टी. एम. मशीन चा वापर करतो जेणेकरून आपला वेळ वाचायला हवा

पण अश्यावेळेस नेमके होते तरी काय ज्यावेळेस तुम्हाला अत्यंत पैशाची गरज असते आणि घाई असते त्यावेळेस तुम्ही ATM ए. टी. एम. मशीन मधून पैसे काढतांना अचानक ATM ए. टी. एम. मशीन मध्ये पैसे अडकून जातात आणी तुम्हाला प्रश्न पडतो कि आता ATM ए. टी. एम. मशीन मध्ये पैसे अडकल्यास काय करावे?, हो तर या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या लेखामध्ये नक्कीच मिळणार.

तुमच्या सोबत काय घडले?

आपण असे गृहीत धरू कि समजा तुम्ही ATM ए. टी. एम. मशीन वर गेलात तुमचा पिन टाकून तुम्ही पूर्ण प्रक्रिया केली आणि त्यामधून पैसे न येता फक्त पावती मिळाली आणि तुमच्या खात्यामधून पैसे वजा झालेत आणि सोबतच तुम्हाला एसएमएस सुद्धा प्राप्त झाला. अश्यावेळेस बँक तुमच्या खात्यात ताबडतोब ते पैसे परत टाकणार जर असे घडले नाही तर तुम्हाला साधारण ३ दिवस वाट पहावी लागणार.

तीन दिवस होऊन अजून सुद्धा तुम्हाला तुमचे पैसे परत मिळाले नाही तर तुम्ही तुमच्या ज्या बँकेचे ATM कार्ड असेल त्या बँक मध्ये जाऊन त्यांना तशी कल्पना द्यावी लागणार किंवा तसा अर्ज करावा लागणार, या लेखामध्ये मी तुम्हाला तो अर्ज दिला आहे.

हे सुद्धा वाचा : पिक नुकसान भरपाई फॉर्म | Pik Nuksan Bharpai Form PDF Download 2020

ATM ए. टी. एम. मशीन मध्ये पैसे अडकल्यास बँक शाखेला अर्ज कसा करावा?

सर्व प्रथम तुम्हाला वर विनंती अर्ज असे लिहावे लागेल त्यानंतर शाखाप्रमुख यांचे नावाने अर्ज करावा, यामध्ये विषय आणि अर्जदार याचा उल्लेख असावा आणि सोबतच तुमचा बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर नमूद करावा.

दि. ०८/12/2020 (दिनांक लिहावी) रोजी मला ए.टी.एम. मशीन मधून १०००० रु. काढावयाचे होते वेळ दुपारी २ वाजून २५ मिनीटे या दरम्यान मी आपल्या पुणे (गावाचे नाव लिहावे) मध्ये असलेल्या SBI (ATM मशीन चे नाव लिहावे)  या नावाची ए. टी. एम. मशीन हि गांधी चैकामध्ये (पूर्ण पत्ता लिहावा) असून त्या मशीन मध्ये १०००० रु काढण्यासाठी गेलो असता

मी माझे कार्ड स्वाईप करून माझा पिन टाकून  जेवढी रक्कम काढ्याची तेवढे अंक भरून पूर्ण प्रक्रिया केली व माझी पूर्ण प्रक्रिया सुद्धा झाली व त्यामधून फक्त स्लीप बाहेर आली आणि पैसे आले नाहीत

मी खूप वेळ वाट पाहली परंतु पैसे आलेच नाहीत, माझ्या खात्यामधून पैसे वजा होण्याचा मला तसा मेसेज सुद्धा प्राप्त झाला

आज ३ दिवस होऊन गेलेत तरी सुद्धा ती रक्कम परत माझ्या खात्यामध्ये जमा झाली नाही.

अश्याप्रकारे मी ए.टी.एम. मशीन मधून १०००० रु. काढावयाचा प्रयत्न केला पण कदाचीत काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे ए.टी.एम. मशीन मधून १०००० रु. हि रक्कम निघाली नाही व मी बँक स्टेटमेंट मध्ये चेक केले असता माझ्या खात्यामधून १०००० रु. इतकी रक्कम वजा झाालेली आहे. व ती अजूनपर्यंत जमा झालेली नाही.

तसेच मला माझी १०००० रु. एवढी रक्कम हि परत मिळवून देण्यास मदत करावी हि नम्र विनंती! अधिक माहितीसाठी ट्रान्सॅक्षन (Transaction) ची प्रत सोबत जोडलेली आहे.

आपला विश्वासू

…………………………

हे सुद्धा वाचा : ब्लॉग म्हणजे काय | ब्लॉग कसा तयार करावा

वर दिलेल्या अर्जामध्ये तुम्हाला हवा त्यानुसार तुम्ही बदल करू शकता,

यामध्ये तुमची रक्कम दिनांक व पत्ता हि माहिती तुमच्या सोबत जशी घडली आहे तशी लिहावी या अर्जामध्ये तुम्हाला फक्त एक नमुना सादर केला आहे.

ATM ए. टी. एम. मशीन मध्ये पैसे अडकल्यास काय करावे? याचा अर्ज जर तुम्हाला PDF स्वरुपात हवा असेल तर तो तुम्हाला खाली दिलेला आहे इथून तुम्ही डाउनलोड करू शकता

ATM ए. टी. एम. मशीन मध्ये पैसे अडकल्यास बँक शाखेला करायचा अर्ज डाउनलोड PDF

अर्ज केल्यानंतर साधारण ८ दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम परत मिळणार