शेती आणि प्लॉट चे बाजार भाव कसे काढावे

शेती आणि प्लॉट चे बाजार भाव कसे काढावे
शेती आणि प्लॉट चे बाजार भाव कसे काढावे

शेती आणि प्लॉट चे बाजार भाव कसे काढावे | How to Calculate The Market Price of Agriculture Land and Plots

नमस्कार मित्रांनो आज काल सर्वांना आपल्या शेती आणि प्लॉट ची खरी किंमत जाणून घ्यायची उत्सुकता असतेच आता ती तुम्ही घरबसल्या सुद्धा पाहू शकता आता ती कशी पहायची याची खरी प्रक्रिया तुम्हाला या लेखा मध्ये पाहायला मिळणार आहे.

  1. शेती आणि प्लॉट ची बाजार भाव बघण्यासाठी तुमच्याकडे आधी तुमच्या शेतीचा 7/12 असायला हवा जर तुमच्याकडे 7/12 नसेल तर आमच्या वेबसाइट वर उपलब्ध असलेला डिजिटल 7/12 डाउनलोड कसा करावा हा लेख नक्की वाचा.
  2. तुमच्याकडे डिजिटल सातबारा नसला तरी चालेल तुम्ही ऑनलाइन साधा 7/12 डाऊनलोड केला तरी चालेल.
  3. सातबाऱ्यावर तुम्हाला आकारणी नावाचा उल्लेख असतो त्या अकरणीचीच आज आपल्याला इथे गरज भासणार आहे.
  4. सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या http://www.igrmaharashtra.gov.in/eASR/frmMap.aspx वेबसाइट वर जा इथे तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे आहे.IGR Maharashtra Website
  5. यानुसार तुम्हाला तुमच्या शेतीचे / प्लॉटची सरकारी किंमत ही हेक्टर नुसार कळेल.Agriculture_Land_Bajarbhav
  6. आम्ही तुम्हाला इथे संपूर्ण माहिती पुरविणार आहोत. दिलेल्या तक्त्यानुसार तुम्हाला तुमच्या शेताची किंवा प्लॉटची किंमत ही पर हेक्टर प्रमाणे असेल ती आपण पर एकर प्रमाणे करूया.
  7. तुमच्या 7/12 वरच्या आकारणी नुसार दिलेल्या वेबसाइट वरील तक्त्यावर चेक करा.agri_akarniakarni
  8. त्या हेक्टर मध्ये मिळालेल्या संख्येला 2 ने गुणाकार करा व 2.5 ने भागाकार करा.
  9. वरील प्रमाणे गुणाकार आणि भागाकार केल्या नंतर तुम्हाला जी संख्या मिळेल ती तुमच्या शेतीच्या प्रती एकर प्रमाणे बाजारभाव मिळेल.

उदाहरण:-

तुमच्या शेतीचे एकूण क्षेत्रफळ 2 हेक्टर आहे म्हणजेच 5 एकर आणि आकारणी वरील आकृती प्रमाणे २८ हि आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर तुमच्या आकारणी नुसार दिसत असलेल्या रकान्यामधील माहिती पहावी.

सूत्र :     744000 रु. ( बाजार भाव पर हेक्टर प्रमाणे ) X 2 = 1488000/2.5 = 595200 रु. प्रती एकर भाव

म्हणजे एकूण शेती हि 5 एकर आहे तर 5 x 595200 = 2976000 रुपये एवढी किमंत होईल.

आणि समजा खुल्या प्लॉट मध्ये 2300000 रुपये पर हेक्टर प्रमाणे सरकारी किंमत दिसत असेल तर

Plot Valuation

सूत्र : 2300000 / 1076 = 2137 रुपये पर स्क्वेअर फुट

म्हणजे 1000 स्क्वेअर फुट प्लॉट असला तर  1000 x 2137 =  2137000 रुपये त्या प्लॉट ची किंमत होईल.