डिजिटल सातबारा 7/12 कसा डाउनलोड करावा

How to Download Digital Saatbara

डिजिटल सातबारा 7/12 कसा डाउनलोड करावा

आज जवळ पास सर्वच काम हे ऑनलाईन झाले आहे त्यापैकीच एक म्हणजे डिजिटल सातबारा हो महाराष्ट्र सरकार चे जास्तीत जास्त काम आता ऑनलाईन झाले आहे त्यामधील च एक म्हणजे सर्वाना उपयोगी पडणारा डिजिटल सातबारा.

डिजिटल सातबारा डाउनलोड करण्यासाठी पूर्ण प्रक्रियेची माहिती तुम्हाला या लेखामध्ये मिळणार आहे.

  1. सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल 7/12 डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
  2. डिजिटल सातबारा डाउनलोड करण्याकरिता तुम्हाला तुमची नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
  3. आकृती प्रमाणे New Registration या लिंक वर क्लिक करा.डिजिटल सातबारा वेबसाईट
  4. दिलेल्या चित्राप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमची संपूर्ण माहिती त्या फॉर्म मध्ये भरा.
  5. फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर Check Availability या बटन वर क्लिक करा.Digital Satbara Website Regisration
  6. आता तुमच्या समोर पासवर्ड भरण्यासाठी रकाना आला असेल त्या रकान्यामध्ये तुमचा पासवर्ड लिहा उदा. Easymarathi@123.
  7. Secret Question या पर्यायामध्ये तुम्हाला हवा असला तो प्रश्न निवडा आणि समोरच्या रकान्यामध्ये त्याचे उत्तर लिहा. भविष्यात तुम्ही जर पासवर्ड विसरलात तर तुम्हाला याचा उपयोग होईल.Digital Satbara Website Regisration 1
  8. आता परत डिजिटल सातबाराच्या वेबसाईट ला भेट द्या https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
  9. तुम्ही तयार केलेला लॉगीन आयडी पासवर्ड भरा व आणि दिलेल्या रकान्यामध्ये कॅप्त्चा सुद्धा भरा व लॉगीन बटन वर क्लिक करा.
  10. दिलेल्या आकृतीप्रमाणे Recharge Account या बटन वर क्लिक करा व तुम्हाला हवे असेल तेवढे पैसे त्या खात्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल सातबाराच्या वेबसाईट मधील अकाउंट मधील वॉलेट मध्ये पैसे भरा.Digital Satbara Download
  11. शेवटी तुमची प्रतीक्षा संपली दिलेल्या आकृतीप्रमाणे तुमचा जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा व सर्वे नंबर लिहा, जर तुमचा सातबारा हा ऑनलाईन तयार झाला असेल तर तुम्हाला तो इथे डाउनलोड करायला मिळेल.Digital Satbara Download1
  12. डाउनलोड बटन वर क्लिक करा आणि तुमचा डिजिटल सातबारा डाउनलोड करा.