1500 रू थेट लाभार्थ्यांच्या खात्यात PM SVANIDHI Yojana 2021

PM SVANIDHI Yojana 2021
PM SVANIDHI Yojana 2021

1500 रू थेट लाभार्थ्यांच्या खात्यात | PM SVANIDHI Yojana 2021

नमस्कार मित्रांनो महत्त्वाचे अपडेट आहे लॉक डाऊन पॅकेज | Lock down Package संदर्भातील 1500 रुपये  बँक खात्यामध्ये आता मिळणार आहेत कोणते लाभार्थी त्यासाठी पात्र आहेत जीआर | GR आलेला आहे 29 एप्रिल 2021 चा याकरिता हा लेख पूर्ण वाचा तुम्हाला यामध्ये संपूर्ण माहिती वाचायला मिळेल.

महाराष्ट्र राज्यात कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर एप्रिल 2021 मध्ये कोविड-19 च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.  त्या अंतर्गत राज्यातील फेरीवाले व पथविक्रेते यांच्या व्यवसायावर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत यामुळे फेरीवाले व पथविक्रेते या दुर्बल घटकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे सदर बाब लक्षात घेता माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिनांक १३/०४/२०२१ रोजी दुर्बल घटकांसाठी पॅकेज जाहीर केलेले आहे या अंतर्गत राज्यातील सर्व अधिकृत पत्र विक्रेत्यांना रुपये 1500 ची आर्थिक मदत देण्याची देखील घोषणा करण्यात आलेली आहे यानुसार राज्यातील फेरीवाले व पथविक्रेत्यांना रुपये 1500 आर्थिक मदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

हे सुद्धा वाचा – शेती आणि प्लॉट चे बाजार भाव कसे काढावे

Lock down Package 1500 Rs. GR | PM SVANIDHI Yojana 2021 GR

  1. कोविड-19 मुळे राज्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अधिकृत पत्र विक्रेत्यांना रुपये 1500 ची सहाय्यता रक्कम देण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे असे शासनाच्या जी आर मध्ये सांगितले आहे.
  2. कोविड-19 मुळे राज्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर अधिकृत फेरीवाले व पथ्य विक्रेते यांना प्रत्येकी रुपये 1500 याप्रमाणे आर्थिक मदत देण्यासाठी रुपये ६१.७५  कोटी इतका निधी सह आयुक्त तथा सह संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडे वितरित करण्यास शासनाने याद्वारे मान्यता दिली आहे.
  3. उपरोक्त आर्थिक सहाय्यतेसाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेतअर्ज केलेल्या फेरीवाले व पथविक्रेत्यांना ग्राह्य धरले जाईल.
  4. राज्यातील PM SVANIDHI Yojana 2021 मध्ये दिनांक 15/4/2021 पर्यंत एकूण ४११७४५ पथविक्रेत्यांनी अर्ज केलेले आहेत सदर लाभाचे पॅकेज दिनांक १५/०४/२०२१  पर्यंत PM SVANIDHI Yojana 2021 मध्ये अर्ज केलेल्या पथविक्रेत्यांना लागू करण्यात येईल.
  5. सदर निधी आहरित करून वितरित करण्यासाठी सह आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांना नियंत्रक अधिकारी तसेच संबंधित सहाय्यक संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  6. सदरचा निधी सर्व महानगरपालिकांना तसेच सर्व नगरपरिषदा नगरपंचायती यांना वितरित करण्याचा व सदर निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
  7. सदर चा खर्च हा कामगार व सेवायोजन सेवायोजन सेवा शहरी रोजगार व उपजीविका कार्यक्रम राज्य नागरी उपजीविका अभियान राज्य योजनांतर्गत योजना कार्यक्रम सहाय्यक अनुदाने या लेखाची शहरांतर्गत सन 2021-2022 या चालू वित्तीय वर्षाकरिता उपलब्ध असणाऱ्या तरतुदी मधून खर्ची घालण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत.
  8. दिलेल्या शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्रमांक 166/व्यय-३, दिनांक 26/4/2021 अन्वये दिलेल्या सहमतीस  अनुसरून निर्गमित करण्यात आला आहे.
  9. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक 202104281144104325 असा आहे. व तुम्ही हा आदेश दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता.

डाउनलोड GR

हे सुद्धा वाचा – महाराष्ट्र दुग्ध उद्योजकता विकास योजना 2020

ऑनलाइन पैसे कमविण्याचा मार्ग