अनुक्रमणिका
show
डिजिटल सातबारा 7/12 कसा डाउनलोड करावा
आज जवळ पास सर्वच काम हे ऑनलाईन झाले आहे त्यापैकीच एक म्हणजे डिजिटल सातबारा हो महाराष्ट्र सरकार चे जास्तीत जास्त काम आता ऑनलाईन झाले आहे त्यामधील च एक म्हणजे सर्वाना उपयोगी पडणारा डिजिटल सातबारा.
डिजिटल सातबारा डाउनलोड करण्यासाठी पूर्ण प्रक्रियेची माहिती तुम्हाला या लेखामध्ये मिळणार आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल 7/12 डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
- डिजिटल सातबारा डाउनलोड करण्याकरिता तुम्हाला तुमची नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
- आकृती प्रमाणे New Registration या लिंक वर क्लिक करा.
- दिलेल्या चित्राप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमची संपूर्ण माहिती त्या फॉर्म मध्ये भरा.
- फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर Check Availability या बटन वर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर पासवर्ड भरण्यासाठी रकाना आला असेल त्या रकान्यामध्ये तुमचा पासवर्ड लिहा उदा. Easymarathi@123.
- Secret Question या पर्यायामध्ये तुम्हाला हवा असला तो प्रश्न निवडा आणि समोरच्या रकान्यामध्ये त्याचे उत्तर लिहा. भविष्यात तुम्ही जर पासवर्ड विसरलात तर तुम्हाला याचा उपयोग होईल.
- आता परत डिजिटल सातबाराच्या वेबसाईट ला भेट द्या https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
- तुम्ही तयार केलेला लॉगीन आयडी पासवर्ड भरा व आणि दिलेल्या रकान्यामध्ये कॅप्त्चा सुद्धा भरा व लॉगीन बटन वर क्लिक करा.
- दिलेल्या आकृतीप्रमाणे Recharge Account या बटन वर क्लिक करा व तुम्हाला हवे असेल तेवढे पैसे त्या खात्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल सातबाराच्या वेबसाईट मधील अकाउंट मधील वॉलेट मध्ये पैसे भरा.
- शेवटी तुमची प्रतीक्षा संपली दिलेल्या आकृतीप्रमाणे तुमचा जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा व सर्वे नंबर लिहा, जर तुमचा सातबारा हा ऑनलाईन तयार झाला असेल तर तुम्हाला तो इथे डाउनलोड करायला मिळेल.
- डाउनलोड बटन वर क्लिक करा आणि तुमचा डिजिटल सातबारा डाउनलोड करा.