Google Admob म्हणजे काय?

Google Admob म्हणजे काय?

Google Admob म्हणजे काय या विषयी आपण सविस्तर जाणून घेऊयातGoogle Admob हि सुद्धा हा एक गूगलचीच सेवा आहे Google Admob सुद्धा Google Adsense सारखाच कार्य करतो फ़क्त फरक एवढाच आहे की Google Adsense हा वेबसाइट किंवा ब्लॉग किंवा Youtube Channel वर आपल्या जाहिराती दाखविण्यास परवानगी देतो आणि Google Admob हे फ़क्त मोबाइल म्हणजे एंड्राइड Android Mobile Apps यांवर आपल्या जाहिराती दाखविण्याची परवानगी देतो,

म्हणजे सांगायचे असे की Google Admob  हे फ़क्त Android Mobile Apps वर जाहिराती दाखविण्यासाठी बनविलेले आहे आणि यासाठी तुम्हाला वेगळी नोंदणी किंवा Approval घेण्याची आवश्यकता भासत नाही हे तुम्हाला Google Adsense च्या माध्यमातूनच मिळून जाते.

जसे कि तुमच्याकडे एक Google Adsense चे Approval अकाउंट आहे आणि आता तुम्हाला तुमच्या वेबसाइट किंवा ब्लॉग किंवा youtube channel व्यतिरिक्त तुमच्या Android Mobile App वर सुद्धा तुम्हाला जाहिराती लावून पैसे कमविण्याचे आहे तर तुम्ही Google Admob चा वापर करू शकता, याचा वापर करायसाठी तुम्हाला फक्त तुमचे Android Mobile App हवे. आजकाल जवळ पास ज्यांची स्वतःची वेबसाइट आहे ब्लॉग आहे त्यांचे मोबाइल एप सुद्धा आहेतच वाढती लोकसंख्या आणि मोबाइल प्रति लोकांची वाढती उत्सुकता आणि स्वस्त इंटरनेट हे सर्व बघता आज ज्यांचे स्वतःचे मोबाइल एप आहे त्यांना जाहिराती च्या माध्यमातून म्हणजेच Google Admob च्या माध्यमातून भरपूर फायदा होत आहे.

आज असे म्हटले तर खोटे नाही की Google चा  सर्वात अधिक पैसे कमवून देणारा प्रोडक्ट म्हणजे Google Admob होय कारण आज जवळजवळ ८०% लोक स्मार्ट म्हणजे एंड्राइड मोबाइल फोन (Android Mobile) वापरत आहेत आणि प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये त्यांच्या महत्वाचे कामाचे Android Apps आहेत आणि ते त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करत आहेत आज लोक वेबसाइट किंवा ब्लॉग वर कमी विजिट करतात त्यापेक्षा ते आपल्या मोबाइल मध्ये Android Apps इनस्टॉल करून त्यामध्ये लेख वाचने पसंत करतात आणि सर्वात जास्त महत्वाच म्हणजे मोबाइल गेम्स हो Android mobile Games याच तर जवळजवळ खुप लोकांना वेड लागलय काही लोक आपल्या दिवसातील ४ ते ५ तास या गेम खेळण्यावर घालवितात आणि हेच लोकांच वेड आपल्याला Google Admob च्या माध्यमातून मालामाल करू शकतात.

माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे कि जर तुमची स्वतःची वेबसाईट किंवा ब्लॉग असेल तरी सुद्धा एकवेळेस तरी Android App बनवून Google Admob चा वापर करून बघा तुम्हाला तुमचा Result कळेल, पण हो त्या आधी आमचा Google Play आणि Google Play Store हा पाठ वाचायला अजिबात विसरू नका. तुम्हाला अधिक समजण्याकरिता खालील आकृती पहावी.

What is Google Admob