Google Analytics म्हणजे काय?

Google-Analytics-म्हणजे-काय-10

Google Analytics म्हणजे काय? | What is Google Analytics

या लेखामध्ये आपण Google Analytics म्हणजे काय याच्याविषयी आपण थोडे सविस्तर जाणून घेऊया.

तुम्हाला वाटत असेल आता Google Analytics हे सुद्धा Google चे पैसे कमविण्याचेच प्रोडक्ट आहे का पण नाही हे पैसे कमविण्याचे साधन नसून याचा वापर तुम्ही तुमच्या वेबसाईट, ब्लॉग, Youtube Channel, आणि मोबाईल एप मध्ये करू शकता पण तो कसा ते खाली पाहूया.

Google Analytics हे फक्त तुमची ट्राफिक सोर्स, एकूण ट्राफिक, लाइव ट्राफिक, ओरागानिक ट्राफिक डायरेक्ट ट्राफिक या विषयी सविस्तर Report अहवाल पुरवितो.

आणि हा अहवाल चा तुम्हाला तुमच्या Google Adsense च्या सुरक्षितेकरिता अत्यंत महत्वाचा घडतो.

तुम्ही फक्त Google Adsense चे Approval घेऊन आणि जाहिराती लावून पैसे कमवू शकता त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या Google Adsense ची सुरक्षितता पाळणे अत्यंत गरजेचे असते.

जर तुम्हाला अमर्यादित कालावधी पर्यंत Google Adsense कडून पैसे कमविण्याचे असतील तर तुम्हाला तुमच्या website वर विजीटर म्हणजे ट्राफिक कुठून येत आहे याचे नक्की भान ठेवायला हवे.

तुमच्या website किंवा Blog वर येणारी ट्राफिक (visitors) कुठून येत आहेत कसे येत आहेत या विषयी संपूर्ण अहवाल तुम्ही याच्या मदतीने पाहू शकता.

तुमच्या वेबसाईट वर येणारी ट्राफिक हि डायरेक्ट (Direct Traffic) किंवा Organic Traffic आहे हे सुद्धा तुम्ही यामध्ये तपासू शकता, आणि तुमची वेबसाईट grow करण्यासाठी तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.

Google Analytics चा वापर कसा करावा? | How to Use Google Analytics?

Google Analytics चा कोड आपल्या website वर लावण्याकरिता त्या आधी तुम्हाला ती website तुमचीच मालमत्ता (Property) आहे याचा google ला तुम्हाला पुरावा द्यावा लागतो.

म्हणजेच शहानिशा (Verify) करून द्यावी लागते. आणि त्यानंतर तुम्ही Google Analytics कोड तुमच्या वेबसाइट किंवा ब्लॉग वर लावू शकता.

त्यासाठी मी तुम्हाला कही स्टेप दिल्या आहेत त्यानुसार तुम्ही Google Analytics कोड तुमच्या वेबसाइट वर लावू शकता

  1. https://analytics.google.com/analytics/web दिलेल्या वेबसाइट वर जा आणि तुमचा gmail id टाकून login करा
  2. Admin मेनू वर क्लिक कराGoogle Analytics म्हणजे काय
  3. Create Account या निळ्या कलरच्या बटन वर क्लिक कराGoogle Analytics म्हणजे काय 2
  4. तुम्हाला हवे असेल ते Account Name भरा इथे तुम्ही तुमचे नाव सुद्धा भरू शकता.Google Analytics म्हणजे काय 3
  5. Account Data Sharing Settings सिलेक्ट करूं घ्या जी गूगल तुमच्या सोबत शेअर करेल, आणि Next या बटन वर क्लिक करून घ्या पुढे तुम्हाला Property Add करण्यासाठी option मिळेलGoogle Analytics म्हणजे काय 4
  6. समजा तुम्हाला आता तुमच्या website ला Google Analytics Code लावायचा आहे तर तुम्ही खालीलपैकी web हा पर्याय निवडावा.Google Analytics म्हणजे काय 5
  7. तुमच्या वेबसाइट चे नाव लिहा आणि सोबतच तुमच्या website चा पूर्ण URL enter करा उदा. https://manojdhawale.com/ नंतर तुमच्या website ची category निवडा आणि न चुकता Time Zone निवडा आणि Create बटनावर क्लिक करा.Google Analytics म्हणजे काय 6
  8. आता पूर्णपणे तुमची Property Google Analytics मध्ये add झाली तेव्हा तुम्ही Tracking Info यावर क्लिक करून तुमचा Tracking Code बघू शकता.Google Analytics म्हणजे काय 7
  9. खालील आकृतीप्रमाणे तुम्हाला तुमचा Tracking Code पहायला मिळेलGoogle Analytics म्हणजे काय 8
  10. तुम्हाला दिसत असलेला Tracking Code तुम्ही तुमच्या वेबसाईट च्या <head> tag मध्ये भरावा.Google Analytics म्हणजे काय 9
  11. उदा. <head> <Tracknig Code> </head>